Akola:- गुरांच्या गोठ्याला आग (Fire) लागून शेती उपयोगी साहित्य आणि चारा जळुन खाक झाल्याची घटना हातरुण गावात सोमवारी १७ जुन रोजी रात्रीच्या दरम्यान घडली. या आगीत दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
बाळापूर तालुक्यात येत असलेल्या हातरुन येथील अल्पभूधारक शेतकरी (farmer) रामेश्वर अत्रिक यांच्या टिनशेडच्या गोठ्याला सोमवारी रात्रीच्या दरम्यान आग लागून टिनशेड मध्ये ठेवलेले कुटार व शेती उपयोगी साहित्यासह इतरही साहित्याची राखरांगोळी झाली. या आगीत साहित्याचे नुकसान(Damage to materials) झाल्याने ऐन पेरणीच्या दरम्यान शेतकर्यावर संकट कोसळले आहे. शेतकरी रामेश्वर अत्रीक हे सोमवारी रात्रीच्या दरम्यान आपल्या राहत्या घरी झोपलेले होते. घराच्या समोर अंगणात गुरांचा गोठा आहे. अचानक धूराचे लोट रात्रीच्य दरम्यान दिसून आले. पाहणी केली असता गुरांच्या गोठ्याला आग लागल्याचे समजताच शेजारच्या नागरिकांसह घरातील सदस्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीच्या भक्ष्यस्थानी चारा, शेतीसाहित्य सापडले.
या आगीत चारा व स्पिंकलर व पाईप, लाकडी वखर, लाकडी तिफन, फवारणीचे पंप तीन, शेतातील पाण्याची मोटार पंप(Motor pump), ढेप व सरकीचे पोते, आणि इतर शेतीउपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने शेतकर्याचे अंदाजे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन पेरणीच्या हंगामात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
शेतकर्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी
हातरुण येथील शेतकरी रामेश्वर अत्रिक यांच्या येथील गुरांच्या गोठ्याला आग लागून चारा व शेतीसाहित्याचे नुकसान झाले आहे. या आगीत शेतकर्याचे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकर्यांसमोर संकट निर्माण झाले आहे. शेतकर्याला या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील, निवृत्ती आगरकार, उमेश निर्मळ, संतोष गव्हाळे यांनी केली आहे.