परभणी (Parbhani) :- एक रुपया पिक विम्याचा योजनेला शेतकऱ्यांनी लावला चुना असे वक्तव्य केल्याबद्दल परभणीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर चुना फेकण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला ही घटना दि. 26 एप्रिल शनिवारी सकाळी 11 वाजता दरम्यान घडली..
आंदोलकांना पोलिसांनी घेतल ताब्यात
परभणी येथे आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे परभणी जिल्ह्याचे दौऱ्यावर आहे परभणी मध्ये येताच त्यांनी नरसिंह पोखरणी येथे दर्शन घेऊन परभणी शहरात दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोरून जात असताना भारतीय किसान सभा व युवक काँग्रेस आणि शेतकऱ्यांनी सरकारने चुना लावला आहे असे घोषणा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यावर लांबून चुना फेको आंदोलनाचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मोठा पोलीस बंदोबस्त असल्यामुळे चुना कोणत्याही गाडीवर न पडता रस्त्यावर पडला. आंदोलकांना नवा मोंढा पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, किसान सभा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव कदम, रोहिदास बोबडे, शेख अब्दुल, गोविंद गिरी, प्रदीप सोनटक्के, वैजनाथ देवकते, अरुण हरकळ, सुदर्शन कदम, प्रसाद गोरे, उमेश मिरखेलकर यांचा समावेश आहे.