औसा (Ausa Highway water) : पावसामुळे पाणी हायवेवर येत असल्याची बातमी दैनिक ‘देशोन्नती’ने प्रसिद्ध करताच हायवे प्रशासन खडबडून जागे झाले असून संबंधित अभियंत्याने ज्या ठिकाणी पाणी अडत आहे, त्या ठिकाणी काम करत नाली दुरुस्त करून पाणी व्यवस्थित पुलाखालून काढून दिले. संबंधित अभियंत्याने स्वतः उभे राहून काम करून घेतले व पाण्याला व्यवस्थित वाट करून दिल्यानंतर हायवेवर येणारे पाणी आता बंद झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

20 ऑगस्ट रोजी दैनिक ‘देशोन्नती’ने ‘प्रत्येक पावसात हायवे जातो पाण्याखाली!’ ही बातमी प्रकाशित केली होती. या बातमीचा परिणाम असा झाला की, हायवे लगतच्या दुकानात व (Ausa Highway water) हायवेवर पाणी येत होते. ते पाणी आता व्यवस्थित पुढे जात असल्याने प्रश्न मार्गी लागणार आहे. परंतु हे पाणी कोणत्या कारणाने थांबले होते? ते कारण शोधून पाण्याला व्यवस्थित वाट करून दिल्याने प्रश्न मार्गी लागला आहे.
औसा शहरानजीक चंद्रलोक ढाब्याजवळ हायवेवर येणारे पाणी येणार नसल्याने प्रवाशात समाधान व्यक्त केले जात आहे. (Ausa Highway water) हायवे लगत दुकाने असल्याने दुकानासमोर जागा व्हावी, यासाठी अनेकांनी हे पाणी अडवल्याचे अभियंता यांनी पाहिले व त्या ठिकाणच्या एका दुकान मालकाने पुढाकार घेऊन जेसीबीच्या साह्याने पाण्याला वाट करून दिली असल्याने पाणी थांबणे बंद झाले आहे. भविष्यात परत पाणी थांबले तर पाणी अडवण्याचा प्रकार पुन्हा होऊ नये, अशी अपेक्षा प्रवाशातून व्यक्त केली जात आहे.




