आगार प्रमुखांचे प्रभारीराज
नियोजित वेळेला बसेस सुटत नसल्याने प्रवासी ताटकळत
अनेक नादुरूस्त बसेस
नियोजनाच्या अभावामुळे हिंगोली आगार तोट्यात
हिंगोली (Hingoli Bus Stand) : येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आगारामध्ये कोणाचेच कोणावर नियंत्रण नसल्याने प्रवाशांना मात्र अनेक गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. नियोजीत वेळेवर बसेस सोडल्या जात नसल्याने प्रवाशांची हेळसांड होत आहे.
जिल्हास्तरीय शहर असलेल्या हिंगोलीमध्ये मागील काही वर्षापूर्वी बसस्थानकाची टोलेजंग इमारत कोट्यावधी रुपये खर्चातून उभारण्यात आलेली आहे. हिंगोली आगारामध्ये जवळपास ६५ बसेस आहेत. त्यामध्ये २० ते २५ बसेस अधून मधून नादुरूस्त होतात. कधी – कधी तर बस बंद पडल्यावर प्रवाशांना धक्का मारून बस सुरू करण्याची वेळ येते. विशेष म्हणजे हिंगोलीच्या आगारातून लांब पल्ल्यासह ग्रामीण भागामध्ये बसेस सोडल्या जातात. दिलेल्या नियोजनाप्रमाणे बसेस सोडल्या जात नसल्याने प्रवाशांना बसची वाट पाहण्याकरीता ताटकळत बसावे लागत आहे.
२० डिसेंबर शुक्रवार रोजी सकाळी ८.४५ वाजता हिंगोली – पुणे ही बस सोडली जाते. परंतु या वेळेमध्ये तर बस सुटली नव्हती. त्यामुळे लांब पल्ल्याला जाणारे अनेक प्रवासी बसची वाट पाहत ताटकळत उभे होते. काही प्रवाशांनी नियंत्रण कक्षामध्ये बस संदर्भात विचारणा केली असता ‘आता थोड्याच वेळात बस लागेल’ असेच उत्तर प्रवाशांना दिले जात होते.त्यानंतर काही प्रवाशांनी संताप व्यक्त केल्यानंतर सकाळी १० वाजता हिंगोली – पुणे ही बस बसस्थानकात लावण्यात आली. त्यानंतर कुठे प्रवासी याबसमध्ये निघून गेले, अशीच गत हिंगोली – सोलापूर या बसचेही झाली.
सदरील बसही नियोजीत वेळेपेक्षा अर्धा ते पाऊन तासानंतर सोडण्यात आली. परभणी मार्गावर फेर्या मारणारी बस हिंगोलीत आल्यानंतर सकाळी ८ वाजता परभणीला न पाठविता भुत्तनर सावंगी येथे सोडल्यामुळे परभणी जाणारे प्रवासी देखील ताटकळत उभे होते. सकाळी परभणीकडे जाणार्या बर्याच बसेसच्या फेर्या रद्द केल्या जातात. (Hingoli Bus Stand) हिंगोली आगारामध्ये कायमस्वरूपी आगार प्रमुख नियुक्त केलेला नाही. बसस्थानक प्रमुख असलेल्या सुनिता गोरे यांच्याकडे आगाराचा प्रभारी पदभार देण्यात आलेला आहे. हिंगोली आगारामध्ये जवळपास २१ बसेस मानव विकासच्या आहेत. त्या बसेस विद्यार्थ्यांना न सोडता इतर प्रवासी फेर्या करीता वापरल्या जातात. बसस्थानकात कर्तव्य पुस्तिका बजावणार्या अधिकार्याचे नियोजन नसल्याने अनेक गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
हिंगोली आगाराच्या अशा गैरसोयीकडे परभणी येथील परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांचेही दुर्लक्ष होत आहे. या (Hingoli Bus Stand) बसस्थानकात सर्रास अॅटो आणुन उभे केले जातात त्यामुळे हे अॅटो स्टँड की बसस्टँड असा प्रश्न देखील प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे.