रिसोड (Central Cooperative Bank) : आंतरराष्ट्रीय सहकार वर्षा निमित्त सहकारातून समृद्धी निर्माण करणे व सहकाराला बळकटी प्रदान करणे या दृष्टीने अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Central Cooperative Bank) यांच्या वतीने मोप या ठिकाणी पंचक्रोशीतील बँकेचे ठेवीदार (Bank Depositors), कर्जदार व सोसायटीचे सदस्य यांचा ग्राहक प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सभे करता मार्गदर्शक म्हणून रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा बँकेचे संचालक अमितभाऊ झनक (MLA and Bank Director Amitbhau Janak) हे होते. व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बँकेचे जेष्ठ संचालक वामनराव देशमुख (Senior Director of Bank Wamanrao Deshmukh) होते. तसेच प्रमुख उपस्थितीत भास्करराव मोरे सहाय्यक निबंधक रिसोड होते. तसेच मोप येथील सरपंच भागवतराव नरवाडे, गणेशराव गारडे उपाध्यक्ष ख वि संघ रिसोड, रामभाऊ नरवाडे बँकेचे निवृत्त अधिकारी, दत्तराव नरवाडे सेवा सह सो अध्यक्ष, डॉ सिकची, श्री सुभाषराव गरकळ, श्री किसनराव नरवाडे माजी सैनिक, तालुका मार्केटिंग अधिकारी श्री पी एन जाधव व एस पी कोकाटे व मोप शाखेचे रोखपाल जयभाये उपस्थित होते.
बँकेचा विविध योजनांचा लाभ!
क्रायकर्माचे प्रस्ताविक तालुका प्रमुख तलवारे यांनी केले. तर सूत्र संचालन श्री अजय जाधव यांनी केले. बँकेचा विविध योजनांचा (Scheme) लाभ जसे की, थकीत पीक कर्जदारास संपूर्ण व्याज माफी योजना व विविध बिगर शेती कर्ज योजना व ठेवी सेवा सुविधांचा लाभ ग्राहकांनी घ्यावा. असे आव्हान माननीय संचालक देशमुख साहेब यांनी केले. तर संस्थेचे सभासद यांनी रु 3.00 पर्यन्त बिनव्याजी कर्जाचा लाभ घ्यावा असे आव्हान मा. झनक साहेब यांनी केले. तसेच बँकेच्या विविध डिजिटल बॅकिंग योजनेबद्दल माहिती पालक शाखाधिकारी रमाकांत मस्करे यांनी दिली. व pmsby अंतर्गत रु 200000/ विमा मयत खातेदार अशोक वाळके यांचे वारस नंदाबाई वाळके यांना माननीय झनक साहेब व देशमुख साहेब यांच्या हस्ते दिला. सदर कार्यक्रमास बँकेचे सभासद, ठेवीदार व सोसायटी सदस्य, तालुक्यातील गटसचिन मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे आभार प्रदर्शन मोप शाखेचे निरीक्षक राऊत यांनी केले.