बुलडाणा (Azim Nawaz Rahi) : सिनेमात पोस्टरला खूप महत्त्व असते, पोस्टरवरून सिनेमा कसा ? याची कल्पना येते. त्याप्रमाणे साहित्य व काव्य जगतात वांग्मयीन पुस्तकाच्या मुखपृष्ठाला तेवढेच महत्त्व आहे. “महाराष्ट्राची शब्ददौलत” अशी ज्यांना उपाधी मिळालेली आहे, ती प्रख्यात कवी व निवेदक अजीम नवाज राही (Azim Nawaz Rahi) यांचा पाचवा कवितासंग्रह, “वळीवाच्या वेळा”.. या बहुप्रतिक्षित काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ प्रख्यात चित्रकार सरदार जाधव यांनी त्यांच्या कल्पक कुंचल्यातून तयार झाले आहे. अथर्व पब्लिकेशन्स जळगावतर्फे प्रकाशित होणारा “वळीवाच्या वेळा” हा राही यांच्या पाचवा कवितासंग्रह.
व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातला एकांत, वर्तमानाचा वतनदार, तळमळीचा तळ ते वळीवाच्या वेळा.. ही अजीम नवाज राही (Azim Nawaz Rahi) यांच्या काव्यात्मक जगण्याची पाच वळणे. या काव्यसंग्रहाची उत्सुकता मराठी साहित्य जगताला लागली आहे !