हैदराबाद गॅझेटनुसार एसटी आरक्षण देण्याची केली मागणी
औंढा नागनाथ (Banjara Samaj Andolan) : राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटीयरनुसार मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण घोषित केले, परंतु पूर्वीपासूनच हैदराबाद गॅझेट मध्ये बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात उल्लेख असल्याने हैदराबाद गॅझेटियर नुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी औंढा नागनाथ तालुक्यातील (Banjara Samaj Andolan) सकल बंजारा समाज बांधवांच्या वतीने नांदेड ते छत्रपती संभाजी नगर जाणाऱ्या मार्गावर औंढा नागनाथ तालुक्यातील धार फाटा येथे सामाजिक कार्यकर्ते साहेबराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 11 सप्टेंबर गुरुवार रोजी दुपारी बारा ते एक वाजे दरम्यान एक तास रास्ता रोको आंदोलन (Banjara Samaj Andolan) केले व मागण्याचे निवेदन प्रशासनास दिले.
या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या आंदोलना (Banjara Samaj Andolan) दरम्यान पोलीस निरीक्षक जी.एस राहीरे पोलीस उपनिरीक्षक शेख खुदुस, दत्ता कानगुले, जमादार संदीप टाक, जमादार गजानन गिरी, वसीम पठाण, सुरेश डाखोरे राजकुमार कुटे अमोल चव्हाण यांनी बंदोबस्त ठेवला होता.