आदिवासी समाजाचा रिसोड शहरात विराट मोर्चा!
रिसोड (Banjara Society) : धनगर, वंजारी तसेच बंजारा समाजाला (Banjara Society) अनुसुचीत जमातीमध्ये समाविष्ट न करणे तसेच सदर समाजाला अनुसुचीत जमातीचे आरक्षण लागु करु नये या मागणीसाठी रिसोड शहरात दिनांक 29 सप्टेंबर रोजी भव्य विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चामध्ये आदिवासी समाजाचे महिला पुरुष लहान मुले वयोवृद्ध सामील झाले होते यामध्ये आदिवासी समाजाचे पारंपारिक पोशाख परिधान करून युवकांनी लक्ष वेधले यावेळी मागण्याच्या विविध घोषणाने रिसोर शहर अक्षरशा दुमदुमले होते. सदर मोर्च्याची सुरुवात रिसोड शहरातील नगरपरिषद जवळून होत सिविल लाईन मार्गे तहसील कार्यालयावर धडकले या ठिकाणी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर (Tehsildar Pratiksha Tejankar) यांना निवेदन सादर करण्यात आले.
अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची शासनाकडे विविध मार्गाने मागणी!
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अनुसुचित जमातीमध्ये समाविष्ट करुन आरक्षण लागू करण्याबाबत धनगर, बंजारा तसेच चंजारी हया जाती विविध मार्गाचा अवलंब करीत आहेत. त्यापैकी बंजारा समाजाने मराठा समाजाप्रमाणे हैद्राबाद गॅझेटचा आधार घेत अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची शासनाकडे विविध मार्गाने मागणी केलेली आहे. सन १९५० च्या हैद्राचाड गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये (Scheduled Tribes) कुठेही उल्लेख नाही तसेच सन १९५२ च्या हैद्राबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज हा “इतर मागासवर्गीय” म्हणजेच ओबीसी मध्ये समाविष्ट असल्याचे दिसत आहे. मग हा समाज हैद्राबाद गॅझेटनुसार आम्हाला सुध्दा अनुसुचित जमातीमध्ये समाविष्ट करा असे का म्हणतो १ हे सर्व चुकीचे आहे. त्यामुळे ईतरही समाज (धनगर, बंजारी) अनुसुचित जमातीमध्ये आमच्या जातीचा समावेश करावा याकरिता मोर्चे व निदर्शने करीत आहे. हे सर्व असंविधानिक आहे. अनुसूचित जमातीमध्ये पुर्वी ४७ जातीचा समावेश होता. सध्यःस्थितीत ४५ जातीचा समावेश अनुसुचित जमातीमध्ये आहे आणि त्यातही ईतर समाजही अनुसुचीत जमातीमध्ये आरक्षणाची मागणी करीत आहे की जे असंविधानिक आहे. अनुसुचित जमातीमध्ये समावेशाची मागणी करणारे बंजारा, वंजारी व धनगर है आर्थिकदृष्टया गर्भश्रीमंत आहेत. सध्यःस्थितीत जी अनुसुचित जमातीमधील समाज आहे तो समाज अजुनपर्यंत सुधारलेला नाही. शार समाजाला अनुसुचित जमातीमध्ये समाविष्ट केल्यास पुर्वी असलेल्या अनुसुचित जमातीमधील समाजाचे मागासलेपण कदापीही दूर होणार नाही. मध्यः स्थितीत अनुसुचित जमातीमध्ये समावेश असलेल्या जातीव्यतिरिक्त कोणत्याही समाजाला (धनगर, बंजारा, बजारी अनुसुचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये. तसेच कोणत्याही प्रकारचे अनुसुचीत जमातीचे आरक्षण देण्यात येऊ नये. कदाचित धनगर बंजारा वंजारी समाजाच्या अनुसूचीत जामतीमध्ये समाविष्ट होण्याच्या मागण्या मंजुर केल्यास आमच्या जादिवासी समाजामध्ये असंतोष निर्माण होऊन बचाव सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व त्यामुळे होणाऱ्या परिणामास शासनच जबाबदार राहिल असे निवेदनात नमूद करण्यात आले. यावेळी कळमनुरी विधानसभेचे माजी आमदार संतोष टारफे यांनी मोर्चाला संबोधित केले. सदर मोर्चाचे नियोजन आदिवासी युवक कल्याण संघ, घोंसर ता. रिसोड जि. वाशिम अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्यावतीने करण्यात आले होते. सदर मोर्चात प्रामुख्याने संतोष टारपे माजी आमदार, सतीश पाचपुते मा. जि प सदस्य, महादेव डाखोरे से नी जिल्हा नियोजन अधिकारी, बाबाराव गोदमले, अविनाश पंधरे, आनंदराव पवार, ओंकार सरकुटे जिल्हा परिषद सदस्य, नवनाथ बोन्डे, रामदास मोधे, दत्तात्रय सोनुळे, मोहन रिट्ठे, एकनाथ धोत्रे, कैलास सुरकुटे, पृथ्वीराज ठाकूर, राजाराम घुकसे, डॉ. अमोल घुकसे, प्रभू जाधव,गोपाल जाधव, सुभाष फुपाटे, गोपाल घुकसे, संतोष शिंदे, माधव जाधव, आश्रुबा नवले, नवनाथ कोकाटे, दशरथ जाधव, सतीश पांडे, विठ्ठल फुपाटे, तुकाराम पांडे, लखन पवार, दिनेश पवार, अंबादास लेकुरवाले, शंकर गिऱ्हे, मुन्ना चिभडे उपस्थित होते.