करोडोची जल जीवन मिशन योजना फेल; जनतेचे आरोग्य धोक्यात
लाखांदूर (Jal Jeevan Mission) : पंचायत समितीच्या आमसभेत सोमवारी दूषित पाणी पुरवठ्याचा गंभीर मुद्दा समोर आला. भागडी गावात जल जीवन मिशन (हर घर नल,हर घर जल) योजने (Jal Jeevan Mission) अंतर्गत करोडो रुपयांचे निधी खर्च करुन विहिर, बोरवेल व पाणी शुध्दीकरण केंद्र, पाईप लाईन ची कामे करण्यात आली, मात्र टाकीत पाणी हे काम अयोग्य, निकृष्ट झाले असल्याने टाकीत पुर्णत: गाळयुक्त नदीचे दुषीत पाणी पोहचते. जल शुध्दीकरण केंद्रांत पाणी शुध्द होत नसल्याने व पाईप लाईन लिकेज असल्याने हे अडत आहे.
पंचायत समितीचे आमसभेत मुद्दा गाजला; मात्र शुध्द पाणी केव्हा मिळेल, प्रतिक्षा कायम
मग तेच दूषीत पाणी टाकीमधून गावाला पुरवठा होत आहे. या संबंधित विभागाला तक्रार करुनही (Jal Jeevan Mission) उपाययोजना नाही. त्यामुळे या बाबत संतप्त सरपंच ओमिता पप्पु मातेरे यांनी थेट पं.स.आमसभेत आ. नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडे तक्रार नोंदवली. यावेळी सरपंचा मातेरे यांनी गाळयूक्त दूषित पाण्याचे नमुने थेट प्लास्टिकच्या बाटलीत आणून सभेत दाखवत पाणी पुरवठा विभागाची पोलखोल केली. या टाकीतून भागडी गावातील तब्बल ९६० घरांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
या दूषित पाण्यामुळे गावकर्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पावसाळ्यात नदीत पाणी आल्यावर त्याच विहिरीच्या माध्यमातून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु हे पाणी अशुद्ध असल्यामुळे लोकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होत आहे, असेही सरपंचांनी सभेत स्पष्ट केले. यावर आ. नाना पटोले (Nana Patole) यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांना धारेवर धरत तातडीने नवीन विहीर व इतर उपाययोजना करून नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले.
मात्र दरवर्षी पं.स.आमसभेत समस्या सरपंच तथा जनतेच्या समस्यांचे तक्रार विषय घेतले जातात. सभेत संबंधितांना खडसाविले जाते, समस्या पुर्ततेची आश्वासन दिली जातात. मुद्दा गाजला, समस्या सुटणार हे असे आश्वासित असले. परंतु (Jal Jeevan Mission) अंमलबजावणी वर्ष संपूनही पूर्ण होत नाही. मागील आमसभेतील समस्यांचे निराकरण न झाल्याने याही समस्येवर योग्य उपाययोजना तात्काळ होणार की नाही? हा उपस्थितांमध्ये संभ्रम असून भागडी ग्रामस्थांची शुध्द पाण्याची प्रतिक्षा आहे.