४३० घरांची पडझड; शेतपिकांचे नुकसान
गोसे धरणाचे ३३ दरवाजे उघडले
गोसे धरणाचे ३३ दरवाजे उघडले
भंडारा (Bhandara Heavy Rain) : जिल्ह्यात व लगतच्या प्रदेशात गत चार दिवसांपासून संततधार अतिवृष्टी होत असल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपासून वैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली असून सध्या वैनगंगेची पातळी २४७.४० मीटर आहे. दुसर्या दिवशीही जिल्ह्यात अतिवृष्टीचे थैमान सुरुच होता. (Bhandara Heavy Rain) अनेक गावांना पुराचा वेढा असून जिल्ह्यातील ८० रस्त्यांवरील वाहतूक बंद पडली आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे.
गत तीन-चार दिवसांपासून संततधार पावसामुळे (Bhandara Heavy Rain) ४३० घरांची पडझड झाली आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासून गोसे धरणाचे ३३ दरवाज्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. दि.९ जुलै रोजी गोसे धरणाचे २१ दरवाजे अडीच मीटरने तर १२ दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले आहे. अनेक गावांना पुराने वेढा घातल्याने जवळपास ३०६ कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
३०६ कुटुुंंबियांना सुरक्षित स्थळी हलविले; प्रशासन सतर्क
याकरीता एमडीआरएफ, एसडीआरएफ पथक कार्यरत आहेत. प्रशासनाने दि.१० जुलैला शाळेला सुट्टी घोषित केली आहे. प्रशासनाकडून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा दिला असून ३४ मंडळांपैकी लाखनी तालुक्यातील मुरमाडी तूप मंडळात १७२.५० मि.मी. सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात पावसाची सरासरी
यावर्षी जिल्ह्यात आजपर्यंत भंडारा तालुक्यात १३२.२, पवनी १६२.४, तुमसर ७६.५, मोहाडी ८५.८, साकोली १३१.०, लाखनी १३८.८ तर लाखांदूर तालुक्यात १६४.४ टक्के पावसाची नोंद करण्यात आली असून आतापर्यंत १०८.३ टक्के (Bhandara Heavy Rain) पावसाची नोंद करण्यात आली आहे.
८० रस्ते बंद
गत चार दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन जिल्ह्यातील ८० रस्ते पाण्याखाली आल्याने बंद पडले आहे. यामध्ये भंडारा तालुक्यातील भंडारा ते कारधा (लहान पूल), खमारी ते माटोरा, दाभा ते कोथुर्णा, शहापूर ते मारेगाव, गोलेवाडी ते डोंगरगाव, पहेला ते चोवा, उसरीपार ते मौदी, चोवा ते उसरीपार, आंबाडी ते सिल्ली, पवनी तालुक्यातील सोनेगाव ते विरली, अड्याळ ते विरली, पिंपळगाव ते सोमनाळा, मेंढेगाव ते सातेपाट, बेटाळा ते पवनी, सोनेगाव ते विरली, भेंडाळा ते मोखारा, कोंढा ते बेलाटी, मेळेगाव ते काकेपार, कोदुली ते धानोरी, भेंडाळा ते मोखारा, ब्रम्ही ते बाचेवाडी, पवनी ते सिरसाळा, तुमसर तालुक्यातील गोंदेखारी ते टेमणी, चुल्हाड ते सुकळी नकूल, कर्कापूर ते रेंगेपार, कर्कापूर ते पांजरा, तामसवाडी ते सितेपार, सिलेगाव ते वाहनी, सुकळी ते रोहा, तामसवाडी ते येरली, उमरवाडा ते सितेपार, येरली ते पिपरा, उमरवाडा ते तामसवाडी, तुमसर ते येरली, परसवाडा ते सिलेगाव, बपेरा ते बालाघाट (पूल), गोंदेखारी ते चांदपूर, मोहाडी तालुक्यातील उसर्रा ते टाकला, डोंगरगाव ते कान्हळगाव (सि.), ताटगाव ते सिहरी, पिंपळगाव ते कान्हळगाव, अकोला ते वडेगाव, आंधळगाव ते आंधळगाव पेठ, भिकारखेडा ते विहिरगाव, दहेगाव ते रोहणा, टांगा ते विहिरगाव, सुकळी ते रोहा, दहेगाव ते रोहणा, साकोली तालुक्यातील विरसी ते उकारा, वांगी ते खोबा, न्याहारवाणी ते कटंगधरा, सराटी ते चिचगाव, लाखनी तालुक्यातील पालांदूर ते निमगाव, गराडा ते मुरमाडी, पोहरा ते गडपेंढरी, पालांदूर ते निमगाव, नवीन मरेगाव ते जुना मरेगाव, पालांदूर ते ढिवरखेडा, लाखांदूर तालुक्यातील किन्ही ते मांढळ, धर्मापुरी ते बारव्हा, मानेगाव ते बोरगाव, आसोला ते आथली, सावरगाव ते नांदेड, कुडेगाव ते गौराडा, किन्हाळा ते मरेघाट, नवीन ईटान ते जुना ईटान, लाखांदूर ते पिंपळगाव, परसोडी ते तई, पाऊलदवणा ते तई, विरली/डांबी ते गौराळा, लाखांदूर ते वडसा, मांढळ ते दांडेगाव, मुरमाडी ते मानेगाव, मुरमाडी ते दहेगाव, मांढळ ते दांडेगाव, मांढळ ते भागडी, बारव्हा ते धर्मापुरी, तिरखुरी ते पेंढरी, मासळ ते सरांडी बु., सरांडी बु. ते किन्ही, असे ८० रस्ते बंद पडले आहेत.
३०६ कुटुुंबियांना सुरक्षित हलविले
जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक गावांना (Bhandara Heavy Rain) पुराच्या पाण्याने वेढा घातला असून काहींच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने तसेच घर पडल्याने अशा ३०६ कुटुंबियांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. भंडारा तालुक्यातील कारधा १२, गणेशपूर ३२, भंडारा शहर (भोजापूर व गणेशपूर) १९०, जमनी ५०, कोंढी (जवाहरनगर) ३, बोरगाव बु. २, पवनी तालुक्यातील पौना खु. ५, तुमसर तालुक्यातील चारगाव ९, लाखांदूर तालुक्यातील चिचगाव १, विरली खु. १, ईटान १, अशा ३०६ कुटुंबियांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे.
४३० घरांचे नुकसान
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ४१२ अंशत: व १८ घरांचे पूर्णत: अशा १३० घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. यामध्ये भंडारा तालुक्यातील अंशत: १३६ , पूर्णत: ०५, पवनी अंशत: ३८, पूर्णत: ०२, तुमसर अंशत: ९१, पूर्णत: ०२, मोहाडी अंशत: ३४ पूर्णत: ०२, साकोली अंशत: ०५, लाखनी अंशत: ६६, पूर्णत: ०४, लाखांदूर अंशत: ४२, पूर्णत: ०३, असे अंशत: ४१२ व पूर्णत: १८, एकूण ४३० घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. तर भंडारा तालुक्यातील खमारी येथील १५ पाळीव जनावरे व गणेशपूर येथील एका वासराचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती नैसर्गिक आपत्तीने दिलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे.
गोसे धरणातून १५ हजार २९८ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग
अतिवृष्टीमुळे नदी, नाले, दुथळी भरुन वाहत आहेत. त्यामुळे धरण व (Bhandara Heavy Rain) प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाल्याने पुजारीटोला धरणाचे आठ दरवाजे संजय सरोवर २, बावनथडी धरणाचे सर्व व धापेवाडा बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून गोसे धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले. यामध्ये २१ दरवाजे अडीच मिटरने तर १२ दरवाजे २ मीटरने उघडण्यात आले असून धरणातून १५ हजार २९८ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे.