सार्वजनिक रस्ते व ओपन स्पेसवर बेकायदेशीर अतिक्रमण
भंडारा (Bhandara Layout Scam) : शहरातील अनेक नवीन लेआऊट विकसित करून नागरिकांना प्लॉट विक्री केली जात आहे. अखिल भारतीय नियमानुसार लेआऊट मंजूर करताना रस्ते, नाली, ओपन स्पेस, उद्यान, खेळाचे मैदान आदीसाठी जागा राखीव ठेवण्याची सक्ती आहे. हीच तरतूद मंजूर नकाशावर दाखवून अकृषक परवानगी घेतली जाते. मात्र प्रत्यक्षात अनेक प्रकरणांमध्ये (Bhandara Layout Scam) लेआऊट माफियांनी ह्या सार्वजनिक जागांवर बेकायदेशीर कागदपत्रे तयार करून किंवा कागदपत्रात फेरफार करून जागा विक्री केल्याचे समोर आले आहे.
तसेच काही ठिकाणी शेजारच्या प्लॉटधारकांनी सरकारी करारबंद जागेवर अतिक्रमण करून ती हडपण्याचा प्रकार सुरू केला आहे. या गंभीर प्रकरणावर तात्काळ कारवाई करण्याची नागरिकांकडून मागणी होते आहे.
प्रभाग क्र. ११, राष्ट्रीय महामार्ग ५३ आणि रेल्वे पटरीलगत ‘बांधकाम विभाग कर्मचारी सहकारी गृहनिर्माण सोसायटी’ यांना फक्त निवासी वापराकरिता लेआऊट मंजुरी मिळाली होती. गट क्र. ९१/१, गणेशपूर येथील १.६९ एकर जागेतील मंजूर नकाशानुसार ६७६७ चौ.मी. पैकी ४४१५ चौ.मी.प्लॉट तसेच १६७२ चौ.मी. रस्त्यासाठी व ६८० चौ.मी. (१० टक्के) ओपन स्पेस सोडण्यात आली होती. मंजूर ले-आऊट नकाशा, अकृषक परवाना, नगर रचनाकार यांचे आदेश, रेल्वे विभागाचे नाहरकत व गाईड लाईन नुसार (Bhandara Layout Scam) ले-आऊट मधील रेल्वे पटरी च्या बाउंड्री पासून ३० मीटर जागा, सार्वजनिक रस्ता, ओपन स्पेसकरिता मंजूर ले-आउट नकाशा प्रमाणे सोडलेली होती. ही सर्व सार्वजनिक व ओपन स्पेसची जागा नगर परिषद, भंडारा कडे बोजाविरहित वर्ग झालेली आहे. मात्र या जागेवर सध्या सहा व्यक्तींनी संघटितपणे बेकायदेशीर अतिक्रमण केल्याची तक्रार आहे.
दुसर्या प्रकरणात, नागपूर गृहनिर्माण संस्थेने (म्हाडा) विकसित केलेल्या विदर्भ हाऊसिंग बोर्ड कॉलनी (गट क्र. ८२/१, मौजा गणेशपूर) येथील ९६ गाळ्यांच्या योजनेमधील पश्चिम बाजूने रेल्वेजवळ १२ मीटर रोड व (Bhandara Layout Scam) ओपन स्पेस राखीव ठेवण्याची तरतूद मंजूर नकाशात आहे. तथापि, यावर संत शिवराम महाराज विद्यालयाचे बांधकाम आणि चौघांचे बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याचे आढळले आहे. ही जागा देखील नगरपरिषद भंडाराकडे वर्ग झाल्याची नोंद ७/१२ मध्ये घेतली आहे. मात्र अतिक्रमणधारकांचा दावा आहे की नागपूर गृहनिर्माण संस्थेने त्यांना जागा विकली आहे.
अशा प्रकरणात, सदर संस्थेच्या अधिकार्यांवर कायद्यानुसार चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल व अतिक्रमण काढण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तिसर्या प्रकरणात, भैय्याजी नगर, खाते रोड येथील मंजूर लेआऊटमध्ये मूळ नकाशात ७९ प्लॉट, रस्ते, नाली व ओपन स्पेस दाखवले होते. मात्र भूमाफियांनी खोटे कागदपत्रे तयार करून मूळ ७९ प्लॉटऐवजी ८५ प्लॉट दाखवून, नागरपरिषदेकडे वर्ग केलेल्या ओपन स्पेसवर बेकायदेशीररित्या ६ अतिरिक्त प्लॉट विकले. हे प्रकार भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४६७, ४६८ व ४६९ अंतर्गत गुन्हा असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
सदर घोटाळ्यांची गंभीर दखल घेऊन उपविभागीय अधिकारी, पोलीस व नगर परिषद यांनी अवैध अतिक्रमण त्वरित हटवून दोषींवर फौजदारी कारवाई करावी. तसेच विद्यमान कायदे, संदर्भीय नियम, शासन परिपत्रक व धोरणानुसार कारवाई करून ‘महसूल सप्ताह’ आणि ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या करिता राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांचे वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना माजी आमदार व जिल्हा अध्यक्ष चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
यावेळी पक्षाचे पदाधिकारी व (Bhandara Layout Scam) कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यामध्ये नितेश मारवाडे, जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कांग्रेस, उर्मिला आगाशे, के.डी. चौरागडे, अजय मेश्राम, मधुकर चौधरी, चंद्रशेखर भिवगडे, गितेश ठोंबरे, गौरव नवरखेले, महिपालसिंग ठाकूर,हंसराज आगाशे, भालचंद पाटील, रवी येळणे, युवक प्रदेश सचिव एड. स्वप्निल येरणे, हरिश्चंद्र बंधाटे प्रसिद्धीप्रमुख, जितेंद्र धनराज तुरकर जिल्हा सचिव, कृष्णा बनकर, बालचंद मडावी जिल्हाध्यक्ष आदिवासी विकास सेल, जवाहर कुंभलकर जिल्हाध्यक्ष अभियंता सेल, भास्कर हटवार, राजेंद्र तुरकर, रत्नाकर थाटकर तालुका अध्यक्ष लाखांदूर, पुंडलिक शेंडे सचिव लाखांदूर, इंद्रजीत येळणे शहर उपाध्यक्ष, अंकुश दमाहे, संगीता उईके लाखनी, किशोर मोहतुरे लाखनी, संजय खंडाईत तालुका अध्यक्ष लाखनी, मधुकर चौधरी शहर अध्यक्ष भंडारा, मधुकर भोपे, घनश्याम वंजारी तालुका अध्यक्ष पवनी, अश्विन शेंडे तालुकाध्यक्ष मोहाडी, मोतीलाल येळने, हेमराज नागफासे शहराध्यक्ष तुमसर व इतर पदाधिकारी मोठ्या प्रमाणत उपस्थित होते.