हिंगोली ग्रामीण पोलिसात पाच जनांवर गुन्हा दाखल
हिंगोली (Bhandegaon Firing Case) : तालुक्यातील भांडेगाव येथे जुन्या वादातून मंगळवारी रात्रीच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. ज्यामध्ये बाप लेक ठार झाले असुन दोघेजण जखमी झाल्याने त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या (Bhandegaon Firing Case) प्रकरणात हिंगोली ग्रामीण पोलिसात ५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, (Bhandegaon Firing Case) हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथील कुंडलिक जगताप, बाबाराव जगताप यांच्यामध्ये मागील काही वर्षापासून शेतीचा वाद सुरू होता. त्यातुनच अधून मधून वाद विवादाच्या घटना घडत होत्या. २३ सप्टेंबर रोजी केदार जगताप व उमेश उबाळे यांनी कुंडलिक जगताप यांच्या घरासमोर लघुशंका करण्याच्या कारणावरून कुंडलिक जगताप यांच्यासह अन्य काही जणांनी बाबाराव जगताप यांच्या घराकडे समजाऊन सांगण्याकरीता गेले असता आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवराज कुंडलिक जगताप, पुतण्या व अन्य एकास तुम्ही आम्हाला नेहमीच त्रास देता असे म्हणुन आरोपींनी तुम्हाला आम्ही संपवुनच टाकतो असे म्हणुन शिवीगाळ करून लाथा बुक्याने मारहाण केल्यानंतर ज्ञानेश्वर लक्ष्मण जगताप याने लक्ष्मण उर्फ बाबाराव रायाजी जगताप यास आज यांना जीवंत सोडायचे नाही.
तुम्ही घरातील पिस्तुल आणा असे म्हणाल्याने लक्ष्मण उर्फ बाबाराव जगताप याने घरातील पिस्तुल आणुन लक्ष्मण उर्फ बाबाराव व विठ्ठल जगताप यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने कुंडलिक बापुराव जगताप (४०) त्यांचा मुलगा शिवराज कुंडलिक जगताप (२०) व सुभाष विठ्ठल कुरवाडे, बालाजी सखाराम जगताप यांच्यावर पिस्तुलने गोळीबार केला. यामध्ये कुंडलिक जगताप व त्यांचा मुलगा शिवराज जगताप या दोघांचा मृत्यू झाला. तर सुभाष कुरवाडे, बालाजी जगताप यांनाही जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलने गोळीबार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणात हिंगोली ग्रामीण पोलिसात २४ सप्टेंबर रोजी गजानन सोनाजी जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मण उर्फ बाबाराव रायाजी जगताप, विठ्ठल लक्ष्मण जगताप, ज्ञानेश्वर लक्ष्मण जगताप, केदार नामदेव जगताप, उमेश गंगाराम उबाळे सर्व रा भांडेगाव या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान गोळीबाराची घटना घडल्यानंतर याची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, पोलिस उपनिरीक्षक राहुल घुले, जमादार आकश पंडीतकर, रमेश जाधव, शंकर इडोळे, सुधीर ठेंबरे, आशिष उंबरकर, प्रदिप राठोड, शेख रहीम यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांनीही भेट देऊन गुन्ह्याची माहिती घेतली. कोणतीही अनुचित घटना घडू नये, या दृष्टीने गावात रात्रभर पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
दरम्यान २४ सप्टेंबर बुधवार रोजी दोन्ही मयतांचे शवविच्छेदन जिल्हा शासकीय रुग्णालयात केल्या. नंतर (Bhandegaon Firing Case) मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी दोन्ही मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही दुर्देवी घटना घडल्याने गावात औंढा नागनाथ, कळमनुरी यासह इतर काही ठिकाणच्या पोलिसांचा बंदोबस्त कायम होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे हे करीत आहेत.
गुन्ह्यात चार आरोपींना घेतली ताब्यात
भांडेगाव येथे (Bhandegaon Firing Case) गोळीबाराची घटना घडली. ज्यामध्ये बाप लेकाचा मृत्यू झाला तर दोघेजण जखमी असुन त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. बुधवारी सकाळी हिंगोली ग्रामीण पोलिसात पाच आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने यातील चार आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले.
घटनेच्या वेळी गावात सुरू होते किर्तन
या (Bhandegaon Firing Case) गोळीबाराची घटना घडली तेंव्हा गावामध्ये दुर्गा देवी निमित्ताने किर्तन सुरू होते. याच दरम्यान ग्रामस्थांना फटाक्यासारखा आवाज आला. परंतु आता अनेक जण वाढदिवसा निमित्त फटाक्यांची आतिषबाजी करीत असतात असाच भ्रम गोळीबाराच्या घटनेच्या वेळी ग्रामस्थांना झाला. परंतु या घटनेच्या वेळी उपस्थित महिलेला गोळीबार झाल्याचे दिसुन आल्यानंतर तीने गावात ओरड करीतच धाव घेतली. त्यानंतर या घटनेला वाचा फुटली.
तब्बल १३ वर्षानंतर गोळीबाराच्या घटनेत दोन ठार
हिंगोली जिल्ह्यात अनेक गंभीर घटना मागील कालखंडात घडलेल्या असल्या तरी काही क्वचित घटना या जिल्हावासीयांच्या स्मरणात आहेत. वसमत तालुक्यातील हट्टा ते जवळा बाजार रस्त्यावर जुन २०१२ मध्ये हट्टा ठाण्याचे तत्कालिन सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड हे रात्रीच्या गस्तीवर असताना त्यांच्यावर गुंडा येथील दोघांनी प्राणघातक हल्ला केला होता. त्यावेळी बचावासाठी घोरबांड यांनी गोळीबार केला. त्यात दोघांचा मृत्यू झाला होता. या १३ वर्षाच्या घटनेनंतर आता भांडेगावात जुन्या वादातून गोळीबाराची घटना घडली. ज्यामध्ये कुंडलिक जगताप व त्यांचा मुलगा शिवराज जगताप या दोघांचा मृत्यू झाला.
पिस्तुलचा अधिकृत परवाना
झालेल्या गोळीबाराच्या (Bhandegaon Firing Case) घटनेत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पिस्तुलचा अधिकृत परवाना असुन सदर परवाना ओम जगताप यांच्या नावाने असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले आहे.