लातूर (Bharatiya Kisan Union) : शहरातील रयतू बाजार हा दयानंद गेट परिसरातच चालू ठेवावा, अशी मागणी भारतीय किसान युनियनचे प्रदेश प्रवक्ता राजकुमार सस्तापुरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांकडे गुरुवारी केली. आठ दिवसाच्या आत याबाबत निर्णय घ्या अन्यथा भारतीय किसान युनियन (Bharatiya Kisan Union) व रयतू भाजी व फळ विक्रेते असोसिएशनच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा या निवेदनात दिला आहे.
गेल्या 30 वर्षांपासून रयतू बाजार हा दयानंद गेट परिसरात भरला जातो, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आली आहे. शहराच्या मध्यभागी हा परिसर येत असल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी व ग्राहकांना हे सोयीचे ठिकाण आहे. तसेच शेतकऱ्यांना या या ठिकाणी भाजीपाल्याला योग्य भाव मिळतो शेतकरी व ग्राहक ही साखळी या बाजारातून निर्माण झाली असून महाराष्ट्रात असा बाजार फक्त लातूर येथेच आहे. मात्र असा महत्त्वाचा बाजार वाहतुकीचे अतिक्रमणाचे कारण पुढे करून महापालिकेने (Bharatiya Kisan Union) व वाहतूक पोलिसांनी कारवाई करून बंद केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यामुळे व्यापारी ग्राहक यांच्यासह शेतकऱ्यांचीही गैरसोय झाली असून मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच महापालिका आयुक्तांनी ताबडतोब लक्ष घालून दयानंद गेट परिसरात एक रस्ता रयतू बाजारासाठी राखीव ठेवून येथेच बाजार चालू ठेवावा. आता दिलेली जागा शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना व ग्राहकांना मान्य नाही. त्यामुळे या बाजाराचा प्रश्न येत्या आठ दिवसात मिटवा; अन्यथा भारतीय किसान युनियन व रयतू भाजी व फळ विक्रेते असोसिएशनच्यावतीने महापालिकेविरुद्ध तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा या शिष्टमंडळाने निवेदनात दिला आहे.
या निवेदनावर सस्तापुरे यांच्यासह रयतू भाजी व (Bharatiya Kisan Union) फळ विक्रेते असोसिएशनचे उपाध्यक्ष नितीन कांबळे, किसान युनियनचे अनंत दोडके पाटील, विवेक पाटील, बालाजी सूर्यवंशी, बबन शिंदे, रमजान ढेकळे, अशोक मोरे, धनराज वाघमोडे, सतीश नागरगोजे, समाधान नागरगोजे, न्यामतबी शेख, सत्तार बागवान, अबिदाबी बागवान, रमजान शेख आदींच्या सह्या आहेत.