जिल्ह्यातील सहा दलितांचे मृत्यू नव्हे, तर हत्या; आंदोलनकर्त्यांचा आरोप
लातूर (Bhimsainik Andolan) : लातूर शहरातील स्वामी विवेकानंद राजमाता जिजामाता वसतिगृहातील १३ वर्षीय बालक अरविंद खोपे यांच्यासह अन्य पाच ठिकाणच्या दलित समाजातील व्यक्तींचे मृत्यू नसून त्या हत्या आहेत, असा आरोप करीत या सहाही प्रकरणांच्या सीआयडी चौकशीच्या मागणीसह इतर काही मागण्यांसाठी ‘आम्ही सर्व भीमसैनिक’च्या बॅनरखाली येथील महात्मा गांधी चौकात मंगळवारपासून तीन दिवशीय ‘जबाब दो’ (Bhimsainik Andolan) धरणे आंदोलनास प्रारंभ झाला.
लातूर एमआयडीसी येथील स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वसतिगृहात १३ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला. त्या अगोदर सायली सिद्धार्थ गायकवाड (रा. नायगाव, ता. चाकूर), आकाश व्यंकट सातपुते (रा. भुसणी, ता. औसा), सचिन शिवाजी सूर्यवंशी (देवणी पोलीस ठाणे हद्द), विनोद पंढरी कांबळे (रा. शिरूर अनंतपाळ पो. स्टे. हद्द) या दलित समाजातील व्यक्तीचे संशयास्पद मृत्यू झाले. या सर्व घटनांमधील मृत्यू हे संशयास्पद नव्हे, तर ते दलित हत्याकांड आहे, असा आरोप (Bhimsainik Andolan) आंदोलनकर्त्यांनी केला आहे. जोरदार घोषणाबाजी करीत अशा घटनांचा यावेळी निषेध करण्यात आला. या तीन दिवशीय ‘जवाब दो’ धरणे आंदोलनात तरूण, विद्यार्थी, महिला, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
दलित अन्यायग्रस्त जिल्हा घोषित करा!
या सहाही प्रकरणात सीआयडी चौकशी करावी, सर्व प्रकरणात अॅट्रॉसिटी दाखल करावी. सर्व प्रकरणातील संशयीतांना तात्काळ अटक करण्यात यावी. ही प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावीत. लातूर जिल्ह्याला दलित अन्यायग्रस्त जिल्हा घोषित करावा, वरील सहाही प्रकरणातील तपास अधिकारी बदलावेत, रिंकू बनसोडे यांच्या हत्येची चौकशी करण्यात यावी, गांजूर येथील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांवरील ३५३ सारखे गुन्हे माघार घेण्यात यावेत आदी मागण्यांसाठी हे (Bhimsainik Andolan) आंदोलन सुरु झाले.