वैरागड (Bhandareshwar Temple) : येथील ऐतिहासिक, पौराणिक, हेमांडपंथी आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेले (Bhandareshwar Temple) भंडारेश्वर देवस्थान येथे अज्ञात चोरट्यांनी लिंग पिंड वर असलेला फणा, कलश आणि घंटा चोरून नेल्याची घटना दि. ८ जूनच्या मध्यरात्री घडली.
भंडारेश्वर देवस्थान भाविकांच्या श्रद्धेचे स्थान असून येथे महाशिवरात्री आणि नागपंचमी यादिवशी गणपंचायत तसेच (Bhandareshwar Temple) श्री क्षेत्र भंडारेश्वर देवस्थान समिती मार्फत भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येते. श्रद्धास्थान असलेल्या भंडारेश्वर देवस्थान येथे भाविक चढवा करीत असतात. सन–२००० मध्ये काही चोरट्यांनी सोन्याच्या लालसेपोटी देवस्थानातील गाभार्यात असलेल्या लिंगपिंड काढून बाजूला ठेऊन सोने काढण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर भुरट्या चोरांनी लगातार भंडारेश्वर देवस्थान येथील असलेल्या लिंग पिंड वर असलेला फणा, कलश आणि घंटा चोरून नेल्याच्या घटना घडतच राहिल्या. तक्रार नोंदवून सुद्धा आरमोरी पोलीस विभाग अनभिज्ञ राहून कोणत्याही इसमास जेरबंद करू शकले नाही.
दि. ८ जून रोजी मध्यरात्री घडलेल्या चोरीची घटना सकाळी देवस्थान सुरक्षा रक्षक यांनी देवस्थान समितीच्या पदाधिकार्यांना सांगितली. या नंतर (Bhandareshwar Temple) देवस्थान पदाधिकार्यांनी गावात आणि परिसरात चौकशी करून अखेर दि. १० जून रोजी आरमोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गवते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक नरेश सहारे ,हवालदार मोहूर्ले पुढील तपास करीत आहेत.