नांदेड – पूर्णा महामार्गावरील घटना; अपघातात एक गंभीर जखमी
गौर (Bike Accident) : नांदेड – पूर्णा महामार्गावर पिंपळाभत्त्या येथे दोन दुचाकींचा समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवार ३ ऑक्टोबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली.
संजय शेषेराव आसोरे वय ३४ वर्ष, रा. शक्तीनगर इतवारा नांदेड, असे मयताचे नाव आहे. तर अपघातात शिवप्रसाद अशोकराव पाटील रा. दत्तनगर भावसार चौक नांदेड हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताविषयी पोलिसांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, संजय आसोरे हा आपल्या दुचाकीने नांदेडवरुन पुर्णेकडे येत होता. याचवेळी शिवप्रसाद पाटील हे दुचाकीने पुर्णेहून नांदेडच्या दिशेने जात होते.
पिंपळाभत्त्या गावाजळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. याच एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा व्यक्ती जखमी आहे. सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव मोरे यांनी चुडावा पोलिसांना माहिती दिली. सपोनि. सुशांत किनगे, फौजदार अरुण मुखेडकर, पोलीस अंमलदार प्रभाकर कच्छवे, मिटके, वैâलास ढेंबरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला उपचारासाठी पाठविले. पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. चुडावा पोलिसात नोंद करण्यात आली असून तपास सपोनि. सुशांत किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मुखेडकर तपास करत आहेत.
दुचाकी घसरुन अपघात; एकाचा मृत्यू
भरधाव वेगातील दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात गंभीर जखमी होऊन एकाचा मृत्यू झाला. ही घटना दोन ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सिंगणापूर ते ताडकळस रोडवर गावकरी ढाब्यासमोर घडली. सदर प्रकरणी दैठणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवयीबाई झाकने यांनी तक्रार दिली आहे. देविदास शंकर झाकने वय ३२ वर्ष, असे मयताचे नाव आहे. भरधाव वेगात दुचाकी चालवून घसरुन पडल्याने गंभीर जखमी होऊन स्वत:च्या मृत्युस कारणीभुत ठरल्या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोउपनि. सुर्यवंशी करत आहेत.