राष्ट्रीय विकास व स्थानिक प्रश्नांवर प्रभावी कामगिरीचे संकेत
अमरावती (BJP Sunil Kharate) : शहरातील सामाजिक कार्यकर्ता व स्थानिक राजकारणात सक्रीय असलेले सुनील ब. खराटे (BJP Sunil Kharate) यांनी आज अधिकृतपणे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व कार्याध्यक्ष रविंद्र चव्हान यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना त्यांनी (BJP Sunil Kharate) भारतीय जनता पक्षाचे स्थिर नेतृत्व, विकासाभिमुख धोरणे, आणि राष्ट्रीय विचारसरणीचा उल्लेख केला.
खराटे (BJP Sunil Kharate) यांनी आपल्या स्पष्ट केले की,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मा. अमित शाह यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची कार्यक्षमता हीच देशाच्या विकासाची खरी दिशा आहे. “मला राष्ट्रहितासाठी व्यापक पातळीवर काम करण्याची इच्छा आहे, आणि ती संधी मला (BJP Sunil Kharate) भारतीय जनता पक्षातच मिळू शकते,” असे त्यांनी सांगितले.
विकासाला प्राधान्य, स्थानिक प्रश्नांवर कटिबद्धता
भाजप चा अजेंडा हा देशाच्या सर्वांगीण विकासावर केंद्रीत आहे, हे सांगत सुनील खराटे (BJP Sunil Kharate) यांनी बांगलादेशी नागरिकांच्या खोट्या कागदपत्रांद्वारे अमरावती शहरात होणाऱ्या वास्तव्याच्या प्रश्नावर आपली गंभीर चिंता व्यक्त केली. “विरोधी पक्षात असताना माझ्या आवाजाला दुर्लक्ष करण्यात आले. मात्र भाजप मध्ये सामील झाल्यानंतर या विषयावर ठोस पावले उचलण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन,अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.
जनतेशी थेट संवादाचा संकल्प
सरकार आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करणाऱ्या भाजप च्या धोरणामुळे मतदारांशी थेट संवाद साधता येतो, आणि लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर कार्यवाही करता येते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मी (BJP Sunil Kharate) भारतीय जनता पक्षात सामील होत असून, माझे कार्य हे निःस्वार्थ आणि समाजहितासाठीच राहील. अमरावती शहर, महाराष्ट्र राज्य, आणि देशासाठी मी सतत कार्यरत राहील असे सुनील खराटे यांनी स्पष्ट केले.