पैगंबर मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर
बुलढाणा (Prophet Muhammad) : प्रेषित मोहम्मद यांची जयंती निमित्त ईद मिलादुन्नबी उत्सव समिती बुलढाणाच्या वतीने रविवार 15 सप्टेंबर रोजी इक्बाल चौक येथे जामा मशिदीच्या भव्य प्रांगणात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात 152 रक्तदात्यांनी रक्तदान करून पैगंबरांना अभिवादन केले. (Prophet Muhammad) प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जश्न-ए-ईद मिलादुन्नबी कमिटीच्या वतीने सोमवारी 16 सप्टेंबर रोजी भव्य शोभायात्रेचा आयोजन करण्यात आलेला आहे.
येथे इकबाल चौकातील जामा मशिदीजवळ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन जश्न ए ईद मिलादुन्नबी कमेटीच्या वतीने करण्यात आले होते. या (Prophet Muhammad) शिबिराला बुलढाण्यासह आसपासच्या गावातील तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरात सुमारे 152 रक्तदात्यांनी रक्तदान करून प्रेषित मोहम्मद यांना अभिवादन केले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी ईद मिलादुन्नबी कमिटीचे अध्यक्ष नदीम.एस शेख, रईसोद्दीन काझी, वसीम खान, इमाद काझी, मौलाना कलीम, शेख साजिद, शेख सलमान, सैयद अलीम, समीर पठान, सैयद तस्लीम, मो.शादाब, शेख जुबेर आदिंनी प्रयत्न केले. तर अड.जयश्री शेळके, पोलिस निरिक्षक नरेंद्र ठाकरे, अड.सतिष रोठे, डॉ.अनिस खान, अड.संजय राठोड, मो.सज्जाद, मोईन काझी, नवेद काझाी, कुणाल गायकवाड, जाकिर कुरेशी, युनुस खान, सुफियान नेते, बबलु कुरेशी, सत्तार कुरेशी, कुणाल पैठणकर, जावेद खान, नवाब मिर्झा, सैयद आसिफ, गजेंद्र दांदेड, शब्बीर कुरेशी आदी मान्यवरांनी भेट दिली. विशेष असे कि, जिल्हा रुग्णालयातील रक्त संकलन टिमकडे रक्त संकलनासाठी पिशव्या नसल्याने सुमारे दीडशे ते दोनशे तरुणांना परतावे लागले. ईद मिलादुन्नबी समिती द्वारे आत्तापर्यंत अजान स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, अजमत-ए-मुस्तफा सम्मेलन, नातीया मुशायरा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे डॉ.भिलवेकर, विनोद झगरे, पुजा बनकर, अभिजीत राजपूत, सागर आडबे, संघपाल वाठोरे, अनिल घोडेस्वार, सागर पाटील, खलील पठाण यांनी रक्त संकलनासाठी अथक परिश्रम घेतले.
प्रेषित मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी भव्य मिरवणूक
सोमवार, १६ सप्टेंबर रोजी बुलढाणा शहरात प्रेषित मोहम्मद यांच्या (Prophet Muhammad) जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. शहरातील इंदिरा नगर, जुनागांव येथील अनुयायी इकबाल चौकात जमा होतील, त्यानंतर इक्बाल चौकातून निघालेली भव्य मिरवणूक शहरातील विविध रस्त्यांवरून ईदगाहवर पोहोचेल येथे मिरवणुकीचा समारोप होईल.




