परभणी/जिंतूर (Blood donation camp) : शहर व परिसरातील थायलेसिमीया ग्रस्त बालकांसाठी ओमप्रकाश शेटे यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त जानिमिया एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने शहरातील ग्रामीण रुग्णालयात बुधवर 14 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य (Blood donation) रक्तदान शिबिरात 61 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शहर व परिसरात बहुसंख्येने थायलेसिमीया ग्रस्त बालकांचे प्रमाण असल्यामुळे दर महिन्याला सदरील बालकांना मोठा रक्ताचा पुरवठा लागतो. त्या रक्त साठ्याची पूर्तता करण्यासाठी शहरातील जानिमिया एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने ओमप्रकाश शेटे यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त दर वर्षी ग्रामीण रुग्णालयात शेख वाजीद यांच्या मार्गदर्शनाखाली (Blood donation) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरात परिसरातील 61 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिरात डॉ. सौ परिहार, डॉ. विनोद राठोड यांनी काम पाहिले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी , डॉ. समीर जानिमियाँ, ऍड, इम्रान शेख, आसेफ खान, सय्यद नसीर शुन्नू लाला, शे झीशान, सिदीक कुरेशी मुज्जु सिदीकी, शेख अरबाज शकील,शेख आवेस आत्मराम जठाळे, मारुती शिरगजवार ,किशोर जाधव,कदम किरण,श्रीरंग ढोणे अदींनी परिश्रम घेतले.