गडचिरोली (Gadchiroli) :- गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय (Government Medical) महाविद्यालयातील प्रथम वर्षातील तीन विद्यार्थ्यांना सावली तालुक्यातील व्याहाड बूज. जवळील वैनगंगा नदीच्या पात्रात काल दि. १० मे रोजी दुपारी ४:०० वाजेच्या सुमारास जलसमाधी मिळाली होती. पोलीस विभाग (Police Department) व आपदा गृप च्या माध्यमातून आज रविवारी सकाळी शोध मोहीम राबविण्यात आली असता सकाळी ८.४५ ते ९ वाजता दरम्यान तीनही विद्यार्थ्यांचे मृतदेह (Dead body) मिळाले.
सकाळी ८.४५ ते ९वाजताच्या दरम्यान तीनही विद्यार्थ्यांचे मृतदेह मिळाले
चंद्रपूर -गडचिरोली महामार्गावरील व्याहाड बुज. जवळील वैनगंगा नदीच्या पुलाखाली शनिवारला गडचिरोली येथील वैद्यकीय महाविद्यालयातील गोपाल गणेश साखरे , पार्थ बाळासाहेब जाधव , स्वप्निल उद्धवसिंग शिरे, शिवम श्रीधर जायभाई , सार्थक राजेश पाठक , सुजित धनाजी देशमुख हे विद्यार्थी आंघोळीसाठी आले असता दुपारी ४ वाजेदरम्यान ६ विद्यार्थ्यांपैकी गोपाल गणेश साखरे (२०) रा. चिखली, जि. बुलढाणा, पार्थ बाळासाहेब जाधव (२०) रा. शिर्डी , जिल्हा अहमदनगर,स्वप्निल उद्धवसिंग शिरे ( २०) संभाजीनगर यांना जलसमाधी मिळाली. सावली पोलीस व आपदा गृप च्या सहकार्याने काल शोध मोहीम राबविली. मात्र अंधार झाल्यामुळे शोध मोहीम बंद करण्यात आली होती, पुन्हा आज रविवारी सकाळीच शोध मोहीम सुरू करण्यात आली. सकाळी ८.४५ ते ९वाजताच्या दरम्यान तीनही विद्यार्थ्यांचे मृतदेह मिळाले. तिघांचेही प्रेत सावली येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी (Autopsy) पाठविण्यात आले.या घटनेमुळे सबंधित विद्यार्थ्यांच्या कुटूंबियावर शोककळा पसरली आहे.