रिसोड तहसील कार्यालयातील घटना!
रिसोड (Bribery Case) : रिसोड तहसील कार्यालयात (Tehsil Office) खाजगी काम करणारे शिवा पंडित व्यक्तीला 2,000 रुपये लाच स्वीकारल्या प्रकरणी एसीबी पथकाने (ACB Squad) ताब्यात घेतल आरोपी रिसोड तहसील कार्यालयत गेल्या 30 वर्षापासून खाजगी काम करत होता. तक्रारदार व त्यांचा भाऊ यांच्याविरुद्ध पोस्टे शिरपूर ता. रिसोड येथे अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. त्यावरून त्यांच्याविरुद्ध तहसील कार्यालय रिसोड येथे प्रतिबंधक कारवाई करिता दि.21.07.2025 रोजी तक्रारदार व त्यांचा भाऊ यांना हजर केले असता, निवासी नायब तहसीलदार (Deputy Tehsildar) यांच्या कार्यालयात काम करणारा खाजगी ईसम यांनी पुढील 8 महिने तारखेवर हजर न राहण्याकरिता व कुठलाही त्रास न होण्याकरिता 3000 रु. द्यावे लागतील, अशी लाचेची मागणी तक्रारदार यांना केल्याने तक्रारदार यांच्या तक्रारीवरून दि.30.07.2025 रोजी पडताळणी केली असता, निवासी नायब तहसीलदार यांच्या कार्यालयात काम करणारा खाजगी ईसम यांनी तक्रारदार यांना पंचासमक्ष 3000 रु. ची मागणी करून तडजोडीअंती 2000 रु. लाच रक्कम स्वीकारण्याचे तयारी दर्शविली. दि.31.07.2025 रोजी सापळा कार्यवाही (Trap Proceedings) दरम्यान, पंचासमक्ष आरोपी यांच्या गावातील कामानिमित्त अचानक आलेल्या साक्षीदाराजवळ आरोपी यांनी तक्रारदार यांना लाच रक्कम देण्यास सांगितल्याने साक्षीदार यांनी तक्रारदार कडून 2000 रु. स्वीकारले. यावरून तक्रारदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वर नमुद आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन रिसोड, जि.वाशीम येथे कलम 7A भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a Case) करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आरोपीतांचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून, पुढील निरीक्षण करून तपासणी सुरू आहे. सापळा व तपासी अधिकारी बालाजी तिप्पलवाड, पोलीस निरीक्षक ला.प्र.विभाग.वाशिम सापळा पथक, सापळा सह अधिकारी जगदीश परदेशी, पोलीस उप अधीक्षक पोनी बालाजी तिप्पलवाड, पो हवा. विनोद मार्कंडे, योगेश खोटे, असिफ शेख, चा.पो.कॉ. नाविद शेख, सर्व नेमणूक ला.प्र.वि. वाशिम युनिट
चोर सोडून संन्यासाला शिक्षा का?
लाच प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Department) पथकांनी तहसील कार्यालयातून आरोपीला चौकशी साठी ताब्यात घेतल्यानंतर, माझे पती आजारी असुन ते निर्दोष आहे. तुम्ही चोर सोडून निर्दोष वर का कारवाई करता? असा प्रश्न आरोपीच्या पत्नीने संबंधित अधिकाऱ्यांना (Officers) विचारला तिचा रोख कोणाकडे होता यावर चर्चा तहसील परिसरात रंगली होती.




