सामाजिक भान ठेवून दान केले पाहिजे- राधेश्याम चांडक
बुलडाणा (Buldana Urban Creative Group) : आयुष्यात प्रत्येक जण काही ना काही दु:खाने, आजाराने त्रस्त आहे. परंतु आपण ह्या मतीमंद, विकलांग, दिव्यांग लोकांचे हाल पाहिलेतर, त्यामानाने आपलं दुःख काहीच नाही. म्हणूनच आपण आयुष्यात प्रत्येकाने सामाजिक भान ठेवून अशा लोकांना मदत केली पाहिजे, असे आवाहन बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी ‘गाता रहे मेरा दिल” या चॅरिटी शो उद्घाटनप्रसंगी केले.
येथील सहकार विद्या मंदिरच्या सांस्कृतिक सभागृहात (Buldana Urban Creative Group) बुलडाणा अर्बन क्रियेटीव्ह ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. “गाता रहे मेरा दिल”च्या चॅरिटी शो मध्ये दिव्या फाऊंडेशनला संस्थेच्या वतीने एक लाख रुपयांची मदत दिली. यावेळी बुलडाणा अर्बन क्रियेटीव्ह ग्रुपचे आणि सप्तसुर ऑर्केस्ट्राचे सर्व सदस्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात गणरायाच्या गीताने करण्यात येऊन त्यावर प्रकाश मेश्राम यांनी नृत्य सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकले. कार्यक्रमाचे ॲंकरींग नासिर खान यांनी केले. अनंताभाऊ देशपांडे, तर इंदौर येथील मनीष काबरा, गौरी शिंदे, शितल तायडे, उमेश आजनकर, नरेंद्र राजपूत, सुभाष साबळे यांनी आपल्या गीतात प्रेक्षकांना खिळवून ठेवले होत. यात 70 80 च्या दशकातील सुपरहिट मेलोडी गीतांवर आधारित गाणी गायली होते.
अनंताभाऊ देशपांडे यांनी राग यमन वर आधारित गाणी सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकले. यामध्ये आशा पारेख, शर्मिला टागोर, हेमामालिनी, मुमताज यासोबतच माधुरी दिक्षित यांची देखील गाणी सादर केली. सांगता अनंताभाऊ देशपांडे यांनी “ये मेरे वतन के लोगो” या गीतांने करून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले. या (Buldana Urban Creative Group) कार्यक्रमाचे संगीत नियोजन सप्तसुर ऑर्केस्ट्रा यांनी केले तर रंगमंच प्रकाश व नेपथ्य ची जवाबदारी अमोल आढाव यांनी सांभाळली. तसेच या कार्यक्रमासाठी शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी, पत्रकार तथा बुलडाणा अर्बनचे पदाधिकारी, कर्मचारी व सहकार विद्या मंदिर चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
भाईजींच्या संकल्पनेतून दिव्यांग यांची सेवा करण्याची दृष्टीने , नव्याने निर्माण झालेल्या दिव्य सेवा प्रकल्प वरवंड साठी हा चॅरिटी-शो बुलढाणेकरांच्या संगीत रसिक, प्रेमाच्या साक्षीने व आदरणीय अनंताभाऊ व त्यांच्या सप्तसुर ऑर्केस्ट्राच्या कलाकारांवर अतोनात प्रेम करणाऱ्या संगीत प्रेमींच्या भरगच्च गर्दीने, सहकार ऑडिटोरियम हॉलमध्ये या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला. त्यामध्ये अनंताभाऊ देशपांडे व इतर दिग्गज कलाकारांचे एव्हरग्रीन हिंदी गीत गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, क्लासिकल नृत्य, लहान लहान मुलांची रोमहर्षक कला सादर करण्यात आली.