स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी!
हिंगोली (Burglary) : जिल्हा हद्दीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे (Local Crime Branch) पेट्रोलिंग करीत असताना, दुकानाचे शटर वाकवून नगदी रक्कम चोरणार्या (Thief) आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हे गुन्हे उघड करण्याच्या सुचना जिल्हा पोलिीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे (District Superintendent of Police Shrikrishna Kokate) यांनी पोलिस यंत्रणेल्या दिल्या आहेत. वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश घालण्याकरीता आधूनमधून कोंबींग ऑपरेशन, नाका बंदी, ऑलआऊट ऑपरेशन राबविले जात आहे. 13 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हिंगोली जिल्हा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना माला विरुध्द गुन्ह्यातील आरोपींची (Accused) माहिती घेत असताना मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे श्रावण सुखदेव पवार रा. कारखाना रोड, पोस्ट बाभुळगाव ता. वसमत, राजु गणेश पवार रा. इंदिरा नगर रा. कळमनुरी यांनी 4 जूनला मध्यरात्री वसमत तालुक्यातील बळेगाव येथील गजानन शेषराव नवले यांच्या बळीराजा ट्रेडर्स दुकानाचे शटर व कुलूप तोडून दुकानाच्या गल्ल्यातील नगदी 7 हजार रुपये चोरून नेले होते. त्यामुळे पथकाने दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून नगदी 5200 रुपये जप्त करून हट्टा पोलिसांच्या (Police) स्वाधिन केले. या आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी परभणी जिल्ह्यातील मानवत पोलिस ठाणे (Manavat Police Station) अंतर्गत रामेटाकळी येथील बँकेची तिजोरी फोडून चोरी केल्याचे सांगितले. ही कामगिरी जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठूबोणे तसेच हट्टा ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या पथकाने केली आहे.




