जिंतूर शहरातील रामप्रसाद नगरातील घटना अज्ञातावर चोरट्यांवर गुन्हा दाखल!
परभणी (Burglary) : परभणीच्या जिंतूर शहरातील रामप्रसाद नगरात अज्ञात चोरट्यांनी (Thieves) घरफोडी करत सोन्याचे दागिने मिळून 69 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी जिंतूर पोलिसात (Jintur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय पवार यांनी तक्रार दिली आहे. 1 जून रोजी 4 जून या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दाराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. घरात कपाटातील रोख 15 हजार रुपये आणि 53 हजार 625 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने (Gold Ornaments) चोरुन नेले. घरफोडी झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांना खबर देण्यात आली. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून तपास पोह. वाटोडे करत आहेत.
चोरी करताना एकाला पकडले!
जिंतूर : शहरातील येलदरी रोडवर एका घरात घुसून कपाटातील मौल्यवान वस्तू चोरी करताना एकाला पकडण्यात आले. ही घटना 4 जून रोजी रात्री अकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी अर्जून रोकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन विष्णू राठोड याच्यावर जिंतूर पोलीस ठाण्यात 5 जुनला गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. तपास पोह. पठाण करत आहेत.