2.85 लाखांचा मुद्देमाल हस्तगत!
कारंजा (Burglary) : घरातून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यास शहर पोलिसांनी गजाआड केले. तपासादरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून चोरीला गेलेला 2 लाख 85 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त (Confiscation of Goods) केला आहे.पोलीस स्टेशन कारंजा शहर येथे 17 जुलै रोजी फिर्यादी वैशाली सुधाकर जाधव वय 50 वर्ष रा. सम्राट नगर कारंजा यांनी जबानी रिपोर्ट दिला की, 17 जुलै रोजी त्यांचे ओळखीचे शुभम उर्फ चेतन शिंदे रा. टीटवा ता. बार्शीटाकळी जि. अकोला हा फिर्यादीचे घरी आला होता. घर पाहण्याचा बहाना करुण शुभम शिंदे याने फिर्यादीचे घरातील अलमारीतुन एक सोण्याची चैन वजन अंदाजे 13 ग्रॅम 580 मिली किंमत अंदाजे 1,29,010 रुपये व एक सोण्याचे मिनी मंगळसुत्र ज्यामध्ये फुलाचे डीझाईन असलेले पेन्डॉल वजन अंदाजे 16 ग्रॅम 500 मिली किंमत अंदाजे 1,56,750 रुपये असा एकुण 2,85,760 रुपयांचा माल चोरुन नेला आहे.
तपास पथक तयार करुण वेगवेगळ्या दिशेने रवाना!
अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरुन पोस्टे कारंजा शहर येथे कलम 305 भान्यासंहीता प्रमाणे गुन्हा दाखल करुन गुन्हा तपासात घेतला. सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलीस निरिक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांनी तपास सुत्र हाती घेवुन आरोपी शोध कामी तपास पथक तयार करुण वेगवेगळ्या दिशेने रवाना केले. आरोपी शोध घेत असतांना गुप्त माहीती वरुन आरोपी शुभम उर्फ चेतन संतोष शिंदे वय 24 वर्ष रा. टीटवा ता. बार्शीटाकळी जि. अकोला हा रिलायन्स बायपास कारंजा येथुन पळून जाण्याचे बेतात असल्याची माहीती मिळाल्याने सापळा रचुन नमुद पोलिसांनी आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीस विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याचे ताब्यातुन दोन पंचा समक्ष वर नमुद चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही (Proceedings) पोलीस अधिक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधिक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाडवी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक दिनेशचंद्र शुक्ला, सपोनि जयदिप पवार, पोहवा गणेश जाधव, पोहवा मयुरेश तिवारी, पोहेकाँ अजय धनकर, पोहवा उमेशकुमार बिबेकर, पोका नितीन पाटील, पोका अनिस निमसुरवाले, पोकाँ अमित भगत, पोका मोहम्मद परसुवाले यांनी केली असुन पुढील तपास पोहवा गणेश जाधव करित आहे.