परभणी-गंगाखेड रोडवरील घटना!
परभणी (Bus-Bike Accident) : बस-दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना परभणी-गंगाखेड रोडवर रविवार 22 जून रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली. सदर प्रकरणी सोमवार दुपारपर्यंत, कोतवाली पोलिसात (Kotwali Police) गुन्हा नोंद (Crime Record) झाला नव्हता. अपघाताविषयी पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शेख समीर शेख मियाँ वय 29 वर्ष, रा. शांतिनिकेतन कॉलनी, शेख मुशरम शेख मुश्ताक वय 25 वर्ष, रा. शांतिनिकेतन कॉलनी, असे मयतांची नावे आहेत. रविवारी रात्री लातुरहून नागरपुरकडे जाणारी बस एम.एच. 14 बी.टी. 2683 गंगाखेड रोडवर आली असता, या बस आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला.
अपघातात 1 गंभीर जखमी!
यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, सपोनि. कासले, पोउपनि. मुंढे, पोउपनि. केंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. बस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. बसचालक मद्यपी अवस्थेत (Bus Driver Drunk) होता, अशी चर्चा अपघातस्थळी उपस्थित असलेल्या नागरीकांमध्ये सुरू होती.