भीषण अपघातात सहा जण बालबाल बचावले
औंढा नागनाथ (Car Accident) : औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावर धार फाट्याजवळ भरधाव कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. भीषण थरारक घडलेल्या या अपघातात सुदैवाने कार मधील सहा जण बालवाल बचावले आहेत ही घटना २ ऑक्टोबर गुरुवार रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
कार क्रमांक एमएच ४७ एम ४६२६ ही कार छत्रपती संभाजी नगर येथून जिंतूर मार्गे औंढा नागनाथ कडे येत होती त्यामध्ये सहा प्रवासी होते यातील नावे कळू शकली नाही परंतु सुदैवाने सर्व प्रवासी बाल बाल बचावल्याने मोठा अनर्थ टळला घटनेबाबत ३ ऑक्टोबर शुक्रवार रोजी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात नोंद झाली नसल्याची माहिती औंढा नागनाथ पोलिसांनी दिली.