लाखांदुर येथील वाय.सीं. कॉलेज जवळील हायवेवरील घटना
लाखांदूर (Car-Bike Accident) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालय लाखांदूर समोरील हायवेवर रविवार दि. १० ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता दरम्यान चारचाकी व दुचाकीने समोरासमोर (Car-Bike Accident) धडक दिली.
सविस्तर वृत्त असे की, चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. २९ आर. १४८४ ह्या गाडीने मडेघाट वरून लाखांदूर कडे काही वस्तू खरेदी करण्यासाठी जात असतांना यशवंतराव चव्हाण कॉलेज जवळ अचानक दुचाकीस्वार गाडीने रवी तुकाराम वाघधरे (४५) व मुलगी काजल रवी वाघधरे (१७) रा. पाहूनगाव हे दोघेही लाखांदूर वरून गावाकडे जात असतांना चारचाकी (Car-Bike Accident) वाहनाने धडक दिली.
यात रवी वाघधरे यांच्या पायाला जोरदार जखम बसल्यामुळे त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर महादेव मारबते रा. मासळ व त्यांची पत्नी सरीता महादेव मारबते व मुलगी हे तिघेही चार चाकी वाहनांमध्ये होते. (Car-Bike Accident) चारचाकी वाहनाचे समोरील काच फुटल्याने त्यांच्या पत्नीच्या डोक्याला लागल्याने जखमी झाल्या. तर रवी वाघधरे यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे दाखल करण्यात आले. सदर घटनेचा तपास लाखांदुर पोलिस प्रशासन करीत आहे.