तळोधी बा . (Car-Bike Accident) : नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील चेतन रमेश डोंगरवार (१६) हे भरधाव वेगात दुचाकीने सावरगावकडे जात असताना सावरगाव कडून वाढोणा कड़े येणार्या कार व दुचाकीमध्ये जबर धडक झाली. यात (Car-Bike Accident) दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार दि. ९ ऑगस्टला सकाळी घडली.
संजय गहाणे हे आपल्या मित्रपरिवार सहित वाढोणा कडे एम. एच. ४९ बी. बी. ८४४२ या चारचाकी वाहनाने वाढोणाकडे जात असताना सावरगाव स्मशानभूमी जवळ वाढोणा कडून येणार्या मोटार सायकल स्वार चेतन डोंगरवार हे एम. एच. ३४ ए. आर.३४५५ क्रमांकाच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात (Car-Bike Accident) दुचाकीस्वार चेतन डोंगरवार हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ (Car-Bike Accident) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधाकर भानारकर व अंमलदार अल्का डुकरे हे करीत आहेत.