PSI दिगंबर मोरे

मोहजा इंगोले येथील दिगंबर मोरे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड; शिवसेनेकडून यथोचित सत्कार

PSI Digambar More: महाराष्ट्रातील मोहजा इंगोले येथील दिगंबर मोरे यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. शिवसेनेने त्यांचा सत्कार केला आणि गावात आनंदोत्सव साजरा केला.

मोहजा इंगोले येथील दिगंबर मोरे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड; शिवसेनेकडून यथोचित सत्कार

PSI Digambar More

​रिसोड (PSI Digambar More) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात रिसोड तालुक्यातील मोहजा इंगोले येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील दिगंबर मोरे यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

​या यशाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रिसोड तालुका समन्वयक घनश्याम मापारी यांनी दिगंबर मोरे (PSI Digambar More) यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी शिवछत्रपतींची प्रतिमा देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. दिगंबर मोरे हे सध्या वाशिम पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सेवा बजावत आहेत. विशेष म्हणजे, त्यांचे धाकटे बंधू नंदू मोरे हे देखील मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. कर्तव्य बजावत असतानाच जिद्दीच्या जोरावर दिगंबर मोरे यांनी ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

​मोहजा इंगोले सारख्या छोट्याशा गावातून दिगंबर मोरे यांच्या रूपाने तिसरा (PSI Digambar More) पोलीस उपनिरीक्षक मिळाला आहे. यामुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, "दिगंबर मोरे यांनी गावाचे नाव रोशन करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. ग्रामीण भागातील इतर तरुणांनी त्यांचा आदर्श घेऊन आपल्या कुटुंबाचे व गावाचे नाव लौकिक करावे," असे गौरवोद्गार घनश्याम मापारी यांनी यावेळी काढले. ​या सत्कार प्रसंगी जळगाव जामोद येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले (मोहजा इंगोलेचे रहिवासी) नारायण सरकटे आणि अंकुश कालापाड यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. मोरे यांच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
Nobel Prize 2026: मेंदूतील पेशींवर प्रकाशाद्वारे नियंत्रण; Deisseroth, Hegemann आणि Nagel यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल

Nobel Prize 2026: मेंदूतील पेशींवर प्रकाशाद्वारे नियंत्रण; Deisseroth, Hegemann आणि Nagel यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल

Karl Deisseroth, Peter Hegemann आणि Georg Nagel यांना २०२६चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. Channelrhodopsin आणि Optogeneticsच्या शोधामुळे प्रकाशाच्या मदतीने मेंदूतील चेतापेशींवर नियंत्रण शक

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026