MPSC परीक्षा

MPSC चा मोठा निर्णय; गट-क पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर

MPSC Exam: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणारी परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी घेण्यात येणार

MPSC चा मोठा निर्णय; गट-क पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर

MPSC Exam

पुणे (MPSC Exam) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणारी परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी घेण्यात येणार आहे. आयोगाने सुधारित परीक्षेची तारीख प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये परीक्षा उपकेंद्रांची उपलब्धता, स्थानिक परिस्थिती, वाहतूक व्यवस्था तसेच परीक्षार्थींना परीक्षा केंद्रांवर सुरक्षितपणे आणि वेळेत पोहोचता येईल का, याचा आयोगाने विचार केला. याशिवाय (MPSC Exam) राज्य सेवा मुख्य परीक्षा, सणासुदीचा कालावधी, इतर भरती संस्थांच्या परीक्षांचे वेळापत्रक आणि राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन या बाबींचाही विचार करण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

गट-क संयुक्त पूर्व परीक्षा यापूर्वीही अनेकदा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे (MPSC Exam) परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आता परीक्षा जानेवारी 2027 पर्यंत लांबल्याने उमेदवारांना आपल्या अभ्यासाचे नियोजन पुन्हा करावे लागणार आहे. परीक्षेचे केंद्र, प्रवेशपत्र, वेळ आणि इतर महत्त्वाच्या सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनानंतर सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केला.

Oct 02, 2026
ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर फडणवीसांचा टोला; “मुद्दे किती खरे आहेत, हे तपासून पाहा”

ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर फडणवीसांचा टोला; “मुद्दे किती खरे आहेत, हे तपासून पाहा”

ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर फडणवीसांचा टोला; उपवर्गीकरण आणि अग्निवीरांच्या सरकारी सेवेबाबतही मोठी माहिती.

Sep 29, 2026
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलली; सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलली; सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

MPSCने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलली. स्थापत्य अभियांत्रिकी आणि गट-ब मुख्य परीक्षेलाही स्थगिती; सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार.

Sep 29, 2026