पॉलिटेक्निक इंजिनीअरिंग प्रवेश

दहावीनंतर पॉलिटेक्निकचा मार्ग; CET-JEE च्या स्पर्धेऐवजी विद्यार्थ्यांची पदविकेला पसंती

Polytechnic Engineering Admission: दहावीनंतर बारावी आणि अभियांत्रिकी पदवीला प्रवेश घेण्याऐवजी पॉलिटेक्निकमधून पदविका करून अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल

दहावीनंतर पॉलिटेक्निकचा मार्ग; CET-JEE च्या स्पर्धेऐवजी विद्यार्थ्यांची पदविकेला पसंती

Polytechnic Engineering Admission

 

इंजिनीअरिंगला थेट प्रवेश; 48 हजार जागांसाठी 59 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

मुंबई (Polytechnic Engineering Admission) : दहावीनंतर बारावी आणि त्यानंतर प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून अभियांत्रिकी पदवीला प्रवेश घेण्याऐवजी पॉलिटेक्निकमधून पदविका करून अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढताना दिसत आहे. वेळ आणि खर्चाची बचत तसेच प्रवेश परीक्षेच्या तयारीचा अतिरिक्त ताण टाळता येत असल्याने हा पर्याय विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होत असल्याचे चित्र आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात थेट द्वितीय वर्ष (Polytechnic Engineering Admission) अभियांत्रिकी प्रवेशासाठी उपलब्ध 48 हजार 352 जागांसाठी तब्बल 59 हजार 46 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 42 हजार 732 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, केवळ 5 हजार 620 जागा रिक्त राहिल्या आहेत. गेल्या वर्षी 57 हजार 880 जागांपैकी 41 हजार 902 प्रवेश निश्चित झाले होते, तर 15 हजार 978 जागा रिक्त राहिल्या होत्या.

तीन वर्षांत प्रवेशाचे प्रमाण वाढले..

2023-24 मध्ये उपलब्ध जागांच्या तुलनेत सुमारे 67टक्के प्रवेश झाले होते. हे प्रमाण 2024-25 मध्ये 72 टक्क्यांवर, तर यंदा थेट 88 टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे पदविकेनंतर अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश घेण्याच्या पर्यायाला विद्यार्थ्यांकडून मिळणारा प्रतिसाद वाढत असल्याचे दिसून येते.

वेळ आणि खर्चाची बचत

तज्ज्ञांच्या मते, पूर्वी पॉलिटेक्निककडे प्रामुख्याने रोजगाराभिमुख अभ्यासक्रम म्हणून पाहिले जात होते. मात्र, बदलत्या रोजगाराच्या संधी आणि अभियांत्रिकी पदवीचे वाढते महत्त्व यामुळे पदविकेनंतर (Polytechnic Engineering Admission) अभियांत्रिकी पदवीकडे जाण्याचा मार्ग विद्यार्थ्यांना आकर्षित करत आहे. तसेच, बारावीनंतर CET किंवा JEE सारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करण्याचा अतिरिक्त वेळ आणि खर्च टाळण्यासाठीही काही विद्यार्थी पॉलिटेक्निकचा पर्याय निवडत असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.

संबंधित सामग्री

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; उर्वरित २५ हजार रुपये घेताना तिघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली.

Oct 04, 2026
जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान तीन महिला पत्रकारांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या. दिल्ली पोलिसांनी प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवले.

Oct 04, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026
CJP आंदोलनात तुकाराम मुंढेंचे पोस्टर; मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी

CJP आंदोलनात तुकाराम मुंढेंचे पोस्टर; मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPचे शिवाजी पार्कात आंदोलन; तुकाराम मुंढेंना मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी, तरुणांचा मोठा सहभाग.

Oct 02, 2026
कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर सहविचार सभा; तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन

कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर सहविचार सभा; तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन

कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर महासंघाची बैठक झाली. UDISE+ मधील तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन मिळाले.

Sep 29, 2026