उत्तराखंड हरिद्वार आश्रमातून लातूर पोलीस पथकाने घेतले ताब्यात
लातूर (Dr. Pramod Ghuge) : आपल्याच हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याचा खून करून फरार झालेल्या लातूरच्या आयकाॕन हॉस्पिटलचा प्रमुख डॉक्टर प्रमोद घुगे यास लातूर पोलिसांच्या पथकाने हरिद्वार (उत्तराखंड) च्या एका आश्रमातून ताब्यात घेतले. लातूर पोलिसांनी हरिद्वार पोलिसांच्या साह्याने ही कारवाई केली असून आरोपी डॉक्टर घुगे (Dr. Pramod Ghuge) लवकरच लातूरत आणले जाणार आहे.
लातूर येथे आयकॉन हॉस्पिटलच्या सहा मजली इमारतीवर असलेले एका खोलीत डॉक्टर प्रमोद घुगे यांनी आपला भाचा अनिकेत मुंडे यांस सोबत घेऊन आपल्याच हॉस्पिटलचा कर्मचारी बाळू डोंगरे यास जबर मारहाण केली होती. या मारहाणीत डोंगरे याचा मृत्यू झाला दरम्यान स्वतः डॉक्टर घुगे यांनी बाळू डोंगरे यांचा मृत्यू उपचारादरम्यान आयकॉन हॉस्पिटलमध्ये झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. मात्र डोंगरे यांचे शेवटचे लातूरच्या शासकीय रुग्णालयात झाल्यानंतर डोंगरे यांचा खून झाल्याचा गुन्हा पोलिसात दाखल झाला तेव्हापासून डॉक्टर प्रमोद घुगे फरार झाला होता.
दरम्यान बाळू डोंगरे यांच्या खून प्रकरणी तपासाचे मोठे आव्हान लातूर पोलिसांसमोर होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टर प्रमोद घुगे (Dr. Pramod Ghuge) व त्याचा भाचा अनिकेत मुंडे दोघेही फरार झाल्यापासून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. पोलिसांनी याप्रकरणी स्थानिक पातळीवर तपास केला मात्र या तपासात सीसीटीव्ही फुटेज छेडछाड करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
हॉस्पिटलच्या ज्या रूममध्ये बाळू डोंगरे यांचा खून झाला, त्या रूममध्ये असलेल्या वस्तूंवर कसे सुरु मध्ये फरशी व भिंतीवर रक्ताचे डाग दिसून आले. पोलिसांनी त्याचे स्वॕब घेतले आहेत. शिवाय बाळू डोंगरे याचा अपघात दाखविण्यासाठी हॉस्पिटल बाहेर उभी असलेल्या स्कुटीवर हल्ला करून स्कुटीची मोडतोड केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. एकंदर बाळू डोंगरे यांचा अपघात झाल्याचा डॉक्टर घुगे यांनी रचलेला बेबनाव पोलिसांनी स्थानिक पातळीवर तपासात शोधून काढला. मात्र या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून घुगे फरार असल्याने त्याला अटक करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
लातूर पोलिसांची दोन पथके यासाठी नेमण्यात आली होती. त्यातील एका पथकाने हरिद्वार येथे डॉक्टर घुगे यास स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. (Dr. Pramod Ghuge) घुगे यास घेऊन लातूर पोलीस लातूरकडे निघाल्याचेही वृत्त आहे.




