हिंगोली (Child Unnatural act) : सेनगाव तालुक्यातील एका गावामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे समोर खेळणाऱ्या १० वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्या प्रकरणी गोरेगाव पोलिस (Goregaon Police) ठाण्यात नातेवाईक असलेल्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेनगाव तालुक्यातील एका गावामध्ये असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोरील सिमेंटच्या गड्डवर १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ४ दरम्यान एक १० वर्षीय अल्पवयीन मुलगा खेळत असताना नातेवाईक असलेल्या ४३ वर्षीय चुलत काकाने त्याला घरी बोलावून त्याच्यासोबत (Child Unnatural act) अनैसर्गिक कृत्य केले.
सदर घटनेबाबत १७ फेब्रुवारीला गोरेगाव पोलिस (Goregaon Police) ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नातेवाईक असलेल्या (Child Unnatural act) आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक झळके यांच्यासह पोउपनि एन.व्ही. लेनगुळे, विठ्ठल नवले, सोनाजी रणखांबे, बीडकर यांनी तात्काळ आरोपीला अटक केली. १७फेब्रुवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता ४ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.