Ralegaon :- शहरातील सर्व अधिकृत कृषी केंद्रा मध्ये युरीया सह सर्व आवश्यक औषध व रासायनिक खतांचा बंपर स्टॉक असल्याचे दस्तूरखुद्द तालुका कृषी अधिकारी कार्यालय राळेगांव च्या वतीने कळविण्यात येते पण जास्त पैसे दिल्याशिवाय युरिया मिळत नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल? कारण लिकींग ची जबरदस्ती कंपनी ची आहे हे मान्य करावे लागेल यांत दोष कोणाचा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कृषी केंद्र चालक दरवर्षी विदेशातील भ्रमंती कशी काय वारंवार करु शकतात?
शेतकरी (Farmer)कधी चं चैनी चं आयुष्य जगू शकत नाही पण कृषी केंद्र चालक दरवर्षी विदेशातील भ्रमंती कशी काय वारंवार करु शकतात? हंगाम सुरु होण्यापूर्वी चं लूट ही ठरलेली आहे कारण आर्थिक स्थिती, उधारी, कर्जबाजारीपणा या मुळे शेतकरी बांधव नाईलाजाने कृषी केंद्र चालकांच्या दारी एकदा नाही,?शेतीमाल घरी येईपर्यंत या अवैध सावकारी पण वैध यांच्या शिवाय आपल्या सर्व गरजा म्हणजे आजार, शिक्षण, घरातील शुभकार्य,? दु:खद प्रसंग पूर्ण करु शकत नाही, याचं अगतिकतेचा अलगद लाभ संबंधित उचलत आहे आणि आपण ही समाजसेवा (Social service)करतोय हे संबंधित शासकीय अधिकारी, कर्मचारी, कार्यालय सांगून ‘प्रेताच्या टाळू वरील तर लोणी’ खात नाही ना? असा संशय आता व्यक्त होवू लागला आहे.