चंद्रपूर(chandrapur):-पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंद्यावर र कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांना दिले.
त्या अनुषंगाने पो. नि. महेश कोंडावार स्थागुशा, चंद्रपुर यांनी पथक नेमुन त्यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. दिनांक 03/05/2024 रोजी पेट्रोलिंग (Patrolling) दरम्यान गोपनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली कि, नागपुर मार्गे एका ईग्नीस कार(Ignis) क. MH34 BF 5220 मध्ये अवैधरीत्या सुगंधीत तंबाखु भरून चंद्रपुर कडे येणार आहे. अशा खबरेवरून स्थानिक गुन्हे शाखा(Local Crime Branch) , चंद्रपुर येथील पथकाने पोलीस स्टेशन पडोली चौकात नाकेबंदी (Blockade)केली असता एक पांढरी रंगाची ईग्नीस कार संशयास्पद रित्या चंद्रपुर कडे येतांना दिसली.
त्यास थांबविण्यास सांगितले असता सदर कार रोडच्या बाजुला थांबली. कार चालकास नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव यश राजु ईटनकर वय 19 वर्षे रा. जटपुरा वार्ड, चंद्रपुर असे सांगितले. सदर कारची पंचासमक्ष झडती घेतली असता कारचे मागील डिक्कीत 6 बोरीमध्ये एकुण 660 ईगल हुक्का शिशा तंबाखु पॅकेट किंमत 42,240/-रू चा सुगंधीत तंबाखुचा माल तसेच चारचाकी कार किंमत 5,00,000/-रू असा एकुण 5,42,240/-रू चा शासनाची सुगंधीत तंबाखु (Aromatic tobacco) प्रतिबंधीत असताना व मानवी आरोग्यास हानीकारक असल्याचे माहित असुन सुध्दा सदर माल बाळगुन वाहतुक करीत असता मिळुन आल्याने सदर मुद्देमाल जप्त करून पोस्टे पडोली येथे गुन्हा नोंद केला.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि हर्षल एकरे, सपोनि योगेश खरसान, पोउपनि, विनोद भुरले, पो.हवा. नितीन साळवे, प्रकाश बलकी, अजय बागेसर, नापोशि संतोष येलपुलवार, पोशि. नितीन रायपुरे, चापोहवा प्रमोद डंभारे यांनी केली आहे.