चंद्रपूर (Chandrapur) :- वाघाच्या हल्ल्यात व्यक्ती ठार (Death) झाल्याची घटना चिचपल्ली गावातील चेक पिंपळकु’ येथे १ मे २०२५ च्या रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. मृतकाचे नाव दिवाकर बाबुराव जुमनाके (२७) असे आहे. दिवाकर जुमनाके हे त्यांच्या कुटुंबासह शेतात पूजा करत होते. तेव्हा अचानक ‘मामा’ नावाचा एक कुख्यात नरभक्षक वाघ (Tiger) तिथे आला आणि सर्वांसमोर दिवाकरला उचलून जंगलात घेऊन गेला.
घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली
या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. गावकर्यांनी आवाज करून वाघाला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. काही वेळाने, दिवाकरचा मृतदेह शेतापासून काही अंतरावर असलेल्या एका नाल्याजवळ आढळला, जो वाघाने अर्धवट खाल्ला होता. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने कारवाई केली आणि मृतदेह तात्काळ चंद्रपूर येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासा’ी पा’वण्यात आला. या घटनेबाबत ग्रामस्थां मध्ये प्रचंड संताप आहे. पिंपळखुटचे माजी सरपंच विनोद मेश्राम आणि श्रीकृष्ण जमुनके यांनी प्रशासनाकडे मृतांच्या कुटुंबाला लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी केली आहे. ‘मामा’ या नरभक्षक वाघाला तात्काळ पकडून दुसर्या ‘िकाणी नेण्याची मागणीही करण्यात आली आहे. जर प्रशासनाने या विषयावर त्वरित कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, ज्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल, असा इशारा माजी सरपंच विनोद मेश्राम आणि श्रीकृष्ण जमुनाके यांनी दिला आहे.