बुलढाण्यात ऐतिहासिक शोभायात्रा; विविध राज्यातील झाँकीने वेधले लक्ष!
बुलढाणा (Chhatrapati Sambhaji Maharaj) : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती १४ मे रोजी साजरी होते ती, बुलढाणा शहरातच भव्य दिव्य प्रमाणात. या उत्सवातील ३ दशकाची परंपरा आहे. धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्या संकल्पनेतून डोळ्याचे पारणे फेडणारा ऐतिहासिक जयंती सोहळा यावर्षी सलग तीन दिवस साजरा झाला. ऐतिहासिक शोभायात्रने शिवशंभू प्रेमींच्या गर्दीचे रेकॉर्ड मोडले. जवळपास ८ ते १० राज्यातील सांस्कृतिक पथकांनी सादर केलेल्या झाँकीने वेधले सर्वांचे लक्ष!
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या ३६८व्या जयंतीनिमित्त बुलढाणा येथे आज बुधवार १४ मे रोजी सायंकाळी शिवस्मारकाला अभिवादन करत फटाक्यांच्या आतिषबाजीत, ढोलताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या ऐतिहासिक शोभायात्रेने बुलढाणेकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले. ऐतिहासिक जिवंत देखावे ,उंट घोडे, माँ जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांची साकारलेली वेशभूषा, तंत्रज्ञानाने आकाशात उडणारा हनुमान, मर्दानी खेळ आदी शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे थोर सुपुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे शौर्य, बुद्धिमत्ता आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक मानले जातात. १४ मे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. बुलढाणा शहरात दरवर्षी प्रमाणे यंदाही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्सव समितीने आमदार संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या बलिदानाचे, स्वाभिमानाचे आणि पराक्रमाचे स्मरण करत विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.१४ मे रोजी संध्याकाळी (Chhatrapati Sambhaji Maharaj) श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक संगम चौक येथून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत सुशोभित वाहनावर छत्रपती संभाजी महाराजांची तेजस्वी भव्य प्रतिमा उभारण्यात आली होती. सोबतच माँ जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, बजरंग बली,प्रभू श्रीरामचंद्र यांच्या भव्य प्रतिमा देखील लक्ष वेधून घेत होत्या. शहरातील संगम चौक,जयस्तंभ चौक अशा विविध मार्गाने ही शोभायात्रा काढण्यात आली.

झुलवा पाळणा पाळणा ग..
जयस्तंभ चौकामध्ये सकाळी जन्मोत्सव सोहळा आणि भव्य पाळणा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सांयकाळी निघालेल्या शोभायात्रेत शिवप्रेमी व नागरीकांनी गितांवर ठेका धरत जयंतीचा जल्लोष रात्री उशीरा पर्यंत साजरा केला.या जयंती उत्सवाचे आयोजन (Chhatrapati Sambhaji Maharaj) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, धर्मवीर आखाडा व धर्मवीर युथ फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले होते.
विविध कार्यक्रम संपन्न..
११ मे रोजी सकाळी मोटारसायकल तिरंगा रॅली काढण्यात आली होती, १२ मे रोजी सायंकाळी “शिवशंभो गर्जना” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अभि-अम्मु यांचा शिवगीत, लोकगीत, गोंधळ असा कॉन्सर्ट शो संपन्न झाला. १३ मे रोजी सायंकाळी “गितराधाई उत्सवशाही” हा कार्यक्रम झाला.
रात्री १० वाजता छत्रपती संभाजी महाराज स्मारक, जयस्तंभ चौकात भव्य लेझर लाईट शो आणि रात्री ठीक १२ वाजता फटाक्यांची भव्य आतिषबाजी करण्यात आली.




