छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar Accident) : छत्रपती संभाजीनगर येथील वेरूळ येथे आज भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रक आणि कंटेनरमध्ये समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकी आणि एक चार चाकी स्विफ्ट देखील अपघातात सामील होती. या अपघातात दुचाकीवरील 1 महिला आणि 1 पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला असून, सोबतच स्विफ्ट गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
वेरूळकडून येणारे कंटेनर आणि खुलताबादपासून वेरूळला जाणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि हा भीषण अपघात घडला. खुलताबाद पासून वेरूळ लेणी येथे जाणारा हा घाट परिसर असून, याच घाटात हा अपघात घडला. (Chhatrapati Sambhajinagar Accident) घटनास्थळी कंटेनर अडवा पडला असल्याने संपूर्ण रस्ता जाम झाल्यामुळे, मोठी वाहतूक कोंडी झाली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात दुःख आणि शोक व्यक्त केला जात आहे. पोलीस घटना स्थळी पोहोचली असून, पुढील तपास करत आहे.