काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज भक्त परिवार आक्रमक!
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार (Congress MLA Vijay Wadettiwar) यांनी हिंदू धर्माचे धर्मगुरू अनंत श्री विभूषित जगगुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराजङ यांच्या संदर्भात एकेरी भाषेत बेताल वक्तव्य केले होते, यामुळे समस्त नरेंद्राचार्य महाराजांचे (Narendracharya Maharaj) भक्त अनुयायी व सर्व हिंदू समाजबांधव (Hindu Samajbandha) यांच्या मध्ये प्रचंड संतापाची लाट दिसून आली. वडेट्टीवार यांनी केलेल्या, वक्तव्याचा विरोधात नरेंद्राचार्य जी महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीने क्रांतीचौक येथे निषेध आंदोलन (Protest Movement) करण्यात आले. वडेट्टीवार यांच्या विरोधात भक्त परिवार आक्रमक झालेला पाहायला मिळाला, यावेळी वडेट्टीवार यांच्या फोटोला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले.
घोषणांनी संपूर्ण क्रांतीचौक परिसर दणाणले!!
‘या विजय वडेट्टीवारचं करायचं काय खाली मुंडके वर पाय’, ‘माफी मांगो माफी मांगो वडेट्टीवार माफी मांगो’, होश में आओ वडेट्टीवार होश में आओ, या घोषणांनी संपूर्ण क्रांतीचौक परिसर दणाणून गेला होता. जोपर्यंत विजय वडेट्टीवार जाहीर माफी मागत नाही, तोपर्यंत पुढेही आंदोलन सुरूच ठेवणार असून वेळ प्रसंगी याही पेक्षा तीव्र आंदोलन करणार असल्याचा सज्जड इशारा छत्रपती संभाजीनगर जिल्हा सेवा समितीतर्फे (District Service Committee) देण्यात आला आहे. या आंदोलनात निरीक्षक गिरीश कुलथे, पिठाचे माजी युवा निरीक्षक अभिजीत पगारे, माजी जिल्हाअध्यक्ष शिवाजी इंजे पाटील, जर्नल मोहनदास वैष्णव, कर्नल सांगळे, विनय अथाने, सूरज वडे, शुभम शिंदे, संजय निकम, विकास जयवळ, निर्मला ताई तरटे, मथुरा पेशवे, सिंधू भुबर, यांच्यासह आंदोलनास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सेवा केंद्रातील भक्तगण (Devotees), उपासक शिष्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.