राजकीय चर्चाना उधाण…
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली (Chikhli Assembly Election) : चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या तिकिटासाठी प्रथमच रस्सीखेच होताना पाहायला मिळाली आजपर्यंत राहुलभाऊ बोंद्रे यांच्याविरुद्ध कोणी काँग्रेस पक्षाकडे तिकिट मागत नव्हते. मात्र यावेळी प्रथमच अनेकांनी काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागितले ऐन विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी आमदार धूपदराव सावळे यांनी सुद्धा (Chikhli Assembly Election) चिखली विधानसभा मतदारसंघासाठी तिकीट मागितल्याची चर्चा असून शेवटच्या क्षणी त्यांचेच तिकीट फायनल झाल्याचीही राजकीय वर्तुळात २४आक्टोबर रोजी चर्चा होती. मात्र राहुलभाऊंना तिकीट. मिळाले नाही राहुल बोंद्रे त्यांच्या पत्नी वृषालीताईना वंचित किंवा अपक्ष निवडणूक लढतील असा शक्यतेने काँग्रेस पक्षाने धुपदराव सावळे यांना बाजूला सारून राहुल बोंद्रे यांनाच तिकीट दिल्याची ही राजकीय वर्तुळात चर्चा आहे! एकंदरित वृषाली ताईचे नाव येतातच.भाऊचे तिकीट झाले फिक्स असेच म्हणावे लागेल.
चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये (Chikhli Assembly Election) काँग्रेस पक्ष म्हणजे राहुलभाऊ आणि राहुलभाऊ माझे काँग्रेस असे अनेक वर्षापासून समीकरण बनले आहे मात्र मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळेस तळ्यात मळ्यातल्या भूमिकेपासून काँग्रेस पक्ष सुद्धा चिखलीत ताकही फुंकुन पीत आहे असे दिसते. 2024 च्या निवडणुकीत उमेदवारी मागण्यासाठी राहुल भाऊचे विरोधात प्रथमतः काही कार्यकर्ते पक्षश्रेट्टीपर्यंत पोहोचले होते यामध्ये प्रामुख्याने अंकुशराव वाघ,राम डाहाके असतील यांनी अनेक दिवसापासून प्रयत्न चालवले होते.
राजकीय वर्तुळामध्ये चर्चा अशी आहे की ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी आमदार धुपदराव सावळे यांनी सुद्धा चिखलीसाठी खूप प्रयत्न केले. दिनांक 24 ऑक्टोबर पर्यंत त्यांच्या नावाची काँग्रेस त्यांच्या नावाचा विचार करित होती राजकीय जाणकार सांगतात की त्यांची नावे फायनल झाले होते मात्र राहुल भाऊ बोंद्रे यांना जर काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळाले नाही तर राहुल भाऊ त्यांच्या पत्नी हिरकणी प्रतिष्ठानच्या सर्वेसर्वा हिरकणी पतसंस्थेच्या सर्वेसर्वा वृषालीताई बोंद्रे यांना वंचितच्या माध्यमातून किंवा अपक्ष मैदानात उतरतील व निवडणूक लढतील कारण 2024 ची विधानसभा निवडणूक (Chikhli Assembly Election) पूर्ण ताकतीने लढायची असा ठाम निर्धार आणि तयारी राहुल बोंद्रे यांनी केलेली आहे हे पक्षाला माहित असल्याने व वृषालीताई लढू शकतात या शक्यतेने काँग्रेस पक्षाने. रिक्स नको म्हणून ऐनवेळी यु टर्न घेत राहुलभाऊ यांचेच तिकीट फिक्स केल्याचे कळते.
राजकारणात एवढ्या वेगाने घडामोडी घडतात की कोणाला काही कळण्याच्या आत त्याची चर्चा होण्यापूर्वी त्या दबून जातात आणि लोकही विसरून जातात बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेडराजा मतदारसंघांमध्ये डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केव्हा पक्ष बदलला आणि केव्हा. आणि केव्हा एबी फॉर्म आणला हे ्कळाले सुद्धा नाही बुलढाणा मतदारसंघात सुद्धा ज्या जालिंदर बुधवत यांनी शिवसेना फुटी नंतर जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांना अंगावर घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साठी संघर्ष केला त्यांनीच ऐनवेळी माघार घेऊन काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर असलेल्या जयश्रीताई शेळके यांनी शाहू फुले आंबेडकर यांचा विचारसोबत ठेवत ज्वलंत हिंदुत्ववादी पक्ष असलेल्या शिवसेनेमध्ये एका दिवसात प्रवेश घेऊन तिकीटही मिळवले त्यामुळे राजकारणात कुठल्याही शक्यता नाकारता येत नाहीत असेच चिखली विधानसभा मतदारसंघ मतदार संघात सुद्धा होऊ शकत होते . म्हणून काँग्रेस पक्षाने रिक्स नको म्हणून तात्काळ निर्णय फिरवत राहुलभाऊ चे तिकीट फीक्स केल्याची चर्चा आहे.