पालकमंत्री मेघना बोर्डीकरांची उपस्थिती….!
परभणी (Parbhanit District Hospital) : शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, परभणी, हिंगोली (Parbhanit District Hospital)आणि नांदेड जिल्ह्यातील लहान मुलांसाठी मोफत टूडीइको तपासणी शिबीर जिल्हा रुग्णालयात रविवार १७ रोजी आयोजित करण्यात आले होते. या अंतर्गत एकूण १२३ गरजू बालकांची मोफत टूडीइको तपासणी करण्यात आली. यामधे हृदय रोग झालेल्या बालकांना मोफत शस्त्रक्रिया सिद्धिविनायक रुग्णालय ठाणे येथे करण्यात येणार आहे.
यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर,आरोग्यदूत मंगेश चिवटे,डॉ.अमोल गिते,आनंद भरोसे, सोमनाथ हट्टेकर,विशाल कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार, अधिष्ठाताडॉ. सदानंद भिसे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सारिका बडे ,डॉ कल्याण कदम,हृदयरोग तज्ञ,डॉ येलीकर,हृदयरोग तज्ञ डॉ कुबडे , धैर्यशील कापसे , आप्पाराव वावरे, सौ.गीता सूर्यवंशी,प्रभाकर कदम, प्रल्हाद होगे, शेख शब्बीर ,व इतर मान्यवर पदाधिकारी तसेच जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकनाथ हिरक महोत्सव अंतर्गत हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांसाठी मोफत आरोग्य शिबीर जिल्हा रुग्णालयात रविवारी घेण्यात आले .यात ठाण्यातील नामांकित सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या डॉक्टर टीम तर्फे पूर्णपणे मोफत तपासणी करण्यात आली!
या (Parbhanit District Hospital) उपक्रमात अनेक आरोग्य तपासण्या तसेच आवश्यक सरकारी योजनांसाठी कागदपत्रांची सुविधा देखील देण्यात आली.. या अंतर्गत एकूण १२३ गरजू बालकांची मोफत टूडीइको तपासणी करण्यात आली.यामधे हृदय रोग झालेल्या बालकांना मोफत शस्त्रक्रिया सिद्धिविनायक रुग्णालय ठाणे येथे करण्यात येणार आहे.




