Yawatmal crime :- रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शहरातील तलाव फैल भागात एका २० वर्षीय युवकाने ५५ वर्षीय महिलेच्या घरात घुसून महिलेच्या डोळ्यात मिरची पुड टाकून मंगळसूत्र हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी सदर महिलेने आरडाओरड केली. त्यामुळे आजुबाजुला असलेल्या नागरिकांनी धाव घेतल्याने आरोपी युवकांने मंगळसूत्र घटनास्थळीच ठेवून पळ काढला. मात्र अवघ्या एका तासातच पोलिसांनी (police)आरोपी युवकाच्या मुसक्या आवळल्या आहे.
पोलिसांनी एका तासात आवळल्या आरोपींच्या मुसक्या
याप्रकरणी फिर्यादि पुष्पा रामभाऊ ढोरे (५५) रा. तलावफैल पावर हाऊसच्या बाजुला यवतमाळ यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मिळालेल्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांनी गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता तात्काळ पोलीस स्टेशनचे(Police station)डि.बी. पथक यांना आरोपी शोधुन ताब्यात घेण्याची सुचना दिली. डि. बी. पथकाने तपासाचे चक्र फिरवून तलावफैल परीसरात तलावाच्या झाडात लपुन असलेला आरोपी बदल उर्फ गिरण्या कुमार मडावी याला अटक केली. यावेळी डि.बी. पथकातील पो.उप-नी. सपकाळ, पो.हवा. रावसाहेब शेंडे, पो.शि. गौरव ठाकरे, पो.शि पवन नांदेकर पो. हवा सागर पथ्थे यांनी तलावफैल गाठुन आरोपीचा पाठलाग करुन ताब्यात घेऊन गुन्हा (Crime)नोंद केला.
ही कार्यवाही पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात उप.पो.वि.पोलीस अधिकारी दिनेश बैसाने, पो.नि. रामकृष्ण जाधव यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे प्रगटीकरण पथक (डि.बी.) स.पो. मिलींद सरकटे, पो.उप.नि. गणेश सपकाळ, पो.ह. रावसाहेब शेंडे, पो.ह. प्रदिप नाईकवाडे, ना.पो.कॉ मिलींद दरेकर, पो.शि. गौरव ठाकरे, पो.शि. पवन नांदेकर पो.शि. प्रदिप कुरडकर, पो.शि. अभिषेक वानखडे, पो.शि. प्रतीक नेवरे यांनी केली.