चिमुर (Chimur) :- चिमुर तालुक्यात वादळी वार्यासह पावसाने सुरवात केली. वादळासह पावसाने (Rain)हजेरी लावत ५.४५ वाजताच काळोख दाटत समोरच्या व्यक्तीला रोडवरील काहीच दिशेनासे झाले होते. पाऊस कमी वादळ जास्त होते. त्यामुळे चिमुर तालुक्यात अतोनात नुकसान झाले.
तालुक्यातील अनेक ठिकाणी विजेच्या खांबावर झाडे पडुन आंबेनेरी, भिसी, जांभुळघाट, नेरी, खडसंगी परीसरातील विज पुरवठा अनेक तास खंडीत होता. अनेकांच्या घरावरील छत उडाल्याने त्यांना दुसर्याचा घराचा आसरा घ्यावा लागला. भिसी येथील माणिक भुते, मारोती मुंगले, शंकर मुंगले यांचा घरावरील छत उडाले. शेतकरी बांधवानी आपल्या शेतीची आधीच मशागत करून ठेवली आहे. शेतकरी मुग नक्षत्राच्या पावसाच्या प्रतीक्षेत होता आज अचानक पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात (atmosphere) तसेच शेतकरी बांधवात गारवा निर्माण केला