परभणी/गंगाखेड (Parbhani Crime) : शहरातील संत जनाबाई शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांत सिने स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. प्राध्यापकांत झालेल्या या (Parbhani Crime) मारामारीची चर्चा शहरात होत आहे.
संत जनाबाई महाविद्यालयातील घटना
अत्यंत शिस्तप्रिय व शिक्षणप्रिय अशी ओळख असलेल्या संत जनाबाई शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बुधवार ५ मार्च रोजी महाविद्यालयातील कॅन्टीन परिसरात सात ते आठ प्राध्यापक चहा पाणी घेण्यासाठी एकत्र भेटले. त्यात प्रामुख्याने उपप्राचार्य दयानंद उजळंबे व रामविलास लढ्ढा यांचा समावेश होता. चाय पे चर्चा करतांना महाविद्यालयात संपन्न झालेल्या (Parbhani Crime) विज्ञान आणि भूगोल राष्ट्रीय परिषदेची चर्चा सुरु झाली.
आत्ता शिक्षक करीत आहे आपसात हाणामारीच्या
या परिषदेच्या चर्चेवरून उपप्राचार्य उजळंबे व प्रा. लड्डा यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली तेंव्हा तू सासऱ्याच्या जिवावर आहेस असे प्रा. लड्डा यांनी उपप्राचार्य उजळंबे यांना म्हणताच त्यांनी त्यांच्या पोटात लाथ मारली तर प्रा. लड्डा यांनी ही उपप्राचार्य उजळंबे यांच्या कानफाडीत लगावली दोन्ही प्राध्यापक एकमेकाला हाणामारी करू लागले तेंव्हा उपस्थित प्राध्यापकांनी मध्यस्थी करत (Parbhani Crime) भांडण सोडवून प्रकरण प्राचार्य बी. एम. धूत यांना सांगितले असता प्राचार्य धूत यांनी दोघांना ही तोंडी समज देत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
मात्र महाविद्यालय परिसरातील कॅन्टीन परिसरात सार्वजनिक ठिकाणी दोन प्राध्यापकांत सिने स्टाईल मारामारी झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. विद्यार्थ्यांप्रमाणे आपसात मारामारी करणाऱ्या या (Parbhani Crime) दोन्ही प्राध्यापकांविरुद्ध संत जनाबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व कार्यकारी मंडळ कोणती कारवाई करणार याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे.
प्राचार्यांचे नियंत्रण नाही का?
गंगाखेड शहरातील नावाजलेले महाविद्यालय असलेल्या श्री संत जनाबाई शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय परिसरात दोन प्राध्यापकांमध्ये सिने स्टाईल मारामारीची अप्रिय अशी घटना घडत असेल तर महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एम. धूत यांचा महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वर्गावर नियंत्रण राहिले नसल्याचे दिसून येत असल्याने (Parbhani Crime) महाविद्यालयावर प्राचार्यांचे नियंत्रण राहिले नाही का? असा प्रश्न पालक वर्गातून उपस्थित केला जात आहे.




 
		
