राजकमल उड्डाणपुलाच्या बांधकामाचे नियोजन तत्काळ जाहीर करण्याची मागणी
अमरावती (City Youth Congress) : अचानक बंद करण्यात आलेल्या राजकमल उड्डाणपुलामुळे गेल्या महिनाभरापासून संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. गणेशोत्सवानंतर आता नवरात्री व अंबादेवी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी तीव्र होत असून नागरिकांना दररोज दीड-दोन तास वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र पूल बंद करण्याची घाई करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल नव्याने बांधण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत? हा प्रश्न (City Youth Congress) युवक कॉंग्रेसने कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदनाच्या माध्यमातून केला.
या गंभीर समस्येकडे सरकार, पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासन यांनी अजूनही कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही, अशी टीका शहर युवक काँग्रेसने यावेळी केली आहे. पुलाच्या बांधकामासाठी कोणताही निधी, वेळापत्रक किंवा नियोजन जाहीर करण्यात आलेले नाही. उलट पुल जर्जर असल्याचे अहवाल असतानाही कोट्यवधी रुपये रंगरंगोटी व सजावटीवर खर्च केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
युवक काँग्रेसने (City Youth Congress) सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे विभागाने पुलाच्या पाडकाम व नवीन बांधकामाबाबत तत्काळ सार्वजनिक खुलासा करून काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
सदर निवेदन देताना माजी नगरसेवक मुन्ना राठोड, (City Youth Congress) युवक काँग्रेस शहराध्यक्ष वैभव देशमुख, समीर जवंजाळ, सागर कलाने, आशिष यादव, अक्षय साबळे, निखिल बिजवे, शुभम बांबल, चैतन्य गायकवाड, आकाश धुराटकर, मोहीत भेंडे, निशांत देशमुख, धनंजय बोबडे, शुभम हिवसे, कौस्तुभ देशमुख, केदार भेंडे, पियुष अभ्यंकर, कृणाल गावंडे, निलेश देशमुख, अमित महात्मे, अभिषेक भोसले, साहिल वानरे, निशांत पवार, सम्यक वाकोडे, क्रिश बिसने, शिवानंद भोंगाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.