नकुल देशमुख आणि मित्रपरिवाराचा कौतुकास्पद निर्णय!
रिसोड (CM Aid Fund) : राज्यात वाशिम जिल्ह्यात रिसोड आणि मालेगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकरी बांधवांचे पीक (Crop) संपूर्णपणे हातातून गेले आहे अनेक ठिकाणी जमिनी या संपूर्णपणे खरडून गेल्या आहेत जनावर मृत्युमुखी पडले सोबतच शेतकरी बांधवांच्या शेतीच्या उपयोगी असलेले साहित्य पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत घरांची पडझड झालेली आहे. ही संकटाची परिस्थिती बघता ९ ऑक्टोबर रोजी होणारा वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख नकुल देशमुख यांनी स्नेही पदाधिकारी कार्यकर्ते मित्रपरिवार हितचिंतक यांना केले आहे.
शेतकरी बांधवांच्या ठाम पाठीशी असून भरघोस मदत जाहीर!
या संकटाच्या परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्य सरकार (State Govt) हे शेतकरी बांधवांच्या ठाम पाठीशी असून भरघोस मदत जाहीर केली आहे. परंतु, शेतकरी बांधवांसाठी ही परिस्थिती संकटाची असून अशा परिस्थितीमध्ये वाढदिवस साजरा करणार नसून कार्यकर्ते पदाधिकारी हितचिंतक स्नेही मित्रपरिवार यांनी कोणतेही बॅनर किंवा जाहिरात न देता आणि इतर खर्च न करता शेतकरी (Farmer) बांधवांसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये मदत करणार असल्याचे भाजप नेते नकुल देशमुख म्हणाले. नकुल दादा देशमुख (Nakul Dada Deshmukh) आणि मित्रपरिवार मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये शेतकरी बांधवांसाठी एक सामाजिक बांधिलकी () म्हणून निधी देणार आहेत तसेच सर्वांनी जगाच्या या पोशिंदाच्या मागे ठामपणे उभे राहावे असे आवहान नकुल देशमुख यांनी केले आहे. वाढदिवस साजरा न करता शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी होणारा खर्च हा मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये देण्याच्या या नकुल देशमुख यांच्या निर्णयाचा रिसोड मालेगाव तालुका आणि वाशिम जिल्ह्यात प्रत्येक स्तरातून कौतुक होत आहे.