2 आरोपी विरुध्द गुन्हा दाखल!
मानोरा (Confiscation Alcohol) : पोलीस स्टेशन मानोरा (Police Station Manora) हद्दीतील कारंजा रोडने इंझोरी बिट मध्ये दि. 4 जून रोजी पोलिसांचा ताफा पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून मौजे इंझोरी अडान नदीच्या पुलावर आरोपी गजानन सुदाम बनकर रा. इंझोरी यांच्या ताब्यातील एकटीवा मोटर सायकल एम एच 32 ए जी 7140 ची झडती घेतली असता 64,000 हजार रुपयाचा मुद्देमाल देशी दारू पंचसमक्ष पोलिसांनी जप्त करुन दोन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे.
मुद्देमाल अवैधरीत्या विनापरवाना कब्जात मिळून आल्याने पंच समक्ष जप्त!
पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी गुप्त माहितीवरून इंझोरी अडान नदीचे पुलावर दोन पंच समक्ष पोलिसांनी आरोपी गजानन बनकर यांच्या ताब्यातील अँक्टिव्हावे मोटर सायकलची झडती घेतली असता, गाडीवर एक खाकी रंगाच्या थैलीत 90 एम एल चे देशी दारू बॉबी संत्रा कंपनीचे 200 नग बॉटल किंमत 7000 हजार, रुपये व 180 एम एल देशी दारू बॉबी संत्रा कंपनीचे दोन सीलबंद पेट्या एकूण 96 नग काचेच्या बॉटल किंमत 7000 रुपये तसेच जुनी अँक्टिव्ह मोटर सायकल 50000 हजार असा एकूण 64000 हजार रुपयाचा मुद्देमाल अवैधरीत्या विनापरवाना कब्जात मिळून आल्याने ते पंच समक्ष जप्त केला. सदर दारूचा माल हा कारंजा येथील सराफा लाईन मधील देशी दारूचे दुकानातील असून मनिष गणेशलाल जयस्वाल रा. लक्ष्मीनगर अमरावती ह. मु. निवारा कॉलनी कारंजा असल्याची आरोपीने कबूली दिल्याने दोन्ही आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) (फ) अन्वये गुन्हा दाखल केला. सदर कारवाई पो नि प्रविण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथक पोहवा मदन पुणेवार, सफो रविंद्र राजगुरे, पोलीस शिपाई मनीष अगलदरे, रोहन तायडे, चालक विजय राठोड यांनी केली.