काँग्रेस विधिमंडळ नेते आ. विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परीषदेत मागणी
गडचिरोली (Vijay Vadettiwar) : जिल्ह्यात आता मोठया प्रमाणात उद्योग येत आहेत. या उद्योगासाठी शेतीची जमीन अधिग्रहीत केली जात असल्याने उद्योगासाठी अधिग्रहीत करणार्या शेतजमिनीस हेक्टरी एक कोटीची नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे विधीमंडळ नेते (Vijay Vadettiwar) आ. विजय वडेट्टीवार यांनी आज १७ मे रोजी स्थानीक सर्कीट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परीषदेत केली.
पत्रकार परीषदेस खा.डॉ. नामदेव किरसान, आ. रामदास मसराम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी नगराध्यक्ष अॅड. राम मेश्राम, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अॅड. कविता मोहरकर, प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अॅड. विश्वजित कोवासे तसेच पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकार परीषदेत माहिती देतांना आ. वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) पुढे म्हणाले,गडचिरोली मध्ये अनक औद्योगिक प्रकल्प येत आहेत. यामध्ये जिंदाल ग्रुपचा प्रकल्पाचा समावेश आहे. त्यासाठी जमिनी घेतल्या जाणार आहेत. सिंचनाची सुविधा असलेल्या जमीनीही अधिग्रहीत केल्या जाणार आहेत. पण त्यासाठी दिली जाणारी भरपाई कमी आहे. काँग्रेसचा प्रकल्पाला विरोध नाही.पण एक हेक्टरला एक कोटीची भरपाई देण्यात यावी, या प्रकल्पात स्थानिकांना नोकरी दिली पाहिजे, असे (Vijay Vadettiwar) आ. वडेट्टीवार म्हणाले.
जिंदाल कंपनीला खाणीची परवानगी देण्यासाठी सद्यास्थितीत धावपळ सुरू असल्याचे दिसुन येत आहे.यामध्ये नियमबाह्य काम होत असल्याचे आढळून आल्यास काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असेही आ. वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी पत्रकार परीषदेत सांगितले.
उद्योगांचा फायदा गडचिरोली जिल्ह्यास कमी आणि लुटारूंंच्या टोळीस जास्त
गडचिरोली जिल्ह्यात येणार्या उद्योगांचा फायदा स्थानीकांना कमी आणि खनीज संपत्तीच्या लुटारूंना अधिक होत असल्याचा आरोप आ.वडेट्टीवार यांनी केला.जिंदाल कंपनी ही भाजपाच्या खासदाराच्या मालकीची आहे. त्यांच्या मदतीसाठी आणि त्यातून आपला हिस्सा काढून घेण्यासाठी सत्तारूढ पदाधिकार्यांनी मंजुरी प्रदान केली आहे. जिल्ह्यातील खनीज संपत्ती लुटून नेण्यासाठी अधिकृत, अनाधिकृत मार्गाचा अवलंब केला जात आहे. जिल्ह्यातील नागरीकांना लुटून कुणाचे खिसे भरणार असतील तर काँग्रेस कदापीही सहन करणार नाही. या प्रकल्पाला प्रसंगी विरोध केला जाईल, असेही (Vijay Vadettiwar) आ. वडेट्टीवार म्हणाले.
स्टील प्रकल्पामुळे प्रदुषणाचा धोका, गावांच्या विस्थापनाची येणार पाळी
जिंदाल स्टील कंपनीच्यावतीने देसाईगंज तालुक्यात स्टील प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे प्रदुषणाचा धोका वाढणार आहे. त्यामुळे या तालुक्यातील ८ गावातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. या गावातील नागरीकांच्या पुनर्वसनाची पाळी येणार आहे, असे (Vijay Vadettiwar) आ. वडेट्टीवार म्हणाले.




 
			

