भोयणी येथील घटना!
मानोरा (Crime Case) : तालुक्यातील भोयनी येथील महिला 2 दिवसापूर्वी दवाखान्यामध्ये जातो, म्हणून घरून निघून गेली होती. तिचा मृतदेह (Dead Body) गावातीलच एका विहिरीत सापडल्याची घटना दिनांक 19 रोजी शेतात काम करणाऱ्या मजुराच्या निदर्शनात आल्याने याची माहिती येथील पोलीस पाटील (Police Patil) यांनी पोलीस प्रशासनाला दिली.
घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी पोलीस प्रशासनाला दिली!
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी किशोर शंकर शिंदे वय 31 रा. भोपणी यांनी आपल्या तक्रारी म्हटले आहे की, दि .17 जुलै रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास माहेरी राहत असलेली, माझी बहीण नामे शोभा ज्ञानेश्वर कुऱ्हाडे ही दापूरा येथे खाजगी दवाखान्यामध्ये उपचाराकरिता जातो, म्हणून तिचे 2 मुले माझे आईकडे ठेऊन घरून एकटीच गेली होती. ती संध्याकाळ पर्यन्त घरी परत न आल्याने माझ्या बहिणीचा मी व माझ्या घरच्यांनी गावात व दापूरा येथील नातेवाईकाकडे शोध घेतला असता, ती मिळून आली नव्हती. अशा हरवलेल्या महिलेचा मृतदेह गावाला लगत असलेल्या, जय किसन आशीराम आडे याच्या विहिरीमध्ये दिनांक 19 रोजी शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या (Labor) निदर्शनात आल्यामुळे सदर घटने घटनेची माहिती येथील पोलीस पाटील यांनी पोलीस प्रशासनाला (Police Administration) दिली पोलिसांनी मर्ग दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक महाजन करीत आहे.